वॉशिंग्टन: टेकविश्वातील तिसरा सर्वात मोठा, ट्विटर करार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्कसाठी फायदेशीर ठरत नाही. त्याच्या संपत्तीत झालेली घट याकडे इशारा देत आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला प्रमुख एलन मस्क यांनी टेस्लाचे सुमारे ४ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स विकले आहेत. US सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनच्या दस्तऐवजांवरून मंगळवारी मस्कने टेस्लाचे सुमारे ३.९५ अब्ज किमतीचे १९.५ दशलक्ष शेअर्स विकल्याचे दिसून आले आहे.

एकाच वर्षात १५२ डॉलर्सची संपत्ती गमावणारा अब्जाधीश; आता अदानी करणार मोठा उटलफेर
एलॉन मस्कने टेस्लाचे १९.५ दशलक्ष शेअर्स विकले
रॉयटर्सच्या अहवालानुसार ट्विटरचे नवीन मालक, मस्क यांनी टेस्लाचे १९.५ दशलक्ष शेअर्स ३.९५ बिलियन डॉलर्समध्ये विकले आहेत. मस्कने टेस्ला शेअर्स विकून ट्विटर करारासाठी बहुतेक वित्तपुरवठा मिळवला. रॉयटर्सच्या अहवालानुसार टेस्लाच्या समभागांची किंमत ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आल्याने मस्कची निव्वळ संपत्ती देखील तब्बल २०० डॉलर अब्जच्या खाली घसरली असलती तरी मस्क अजूनही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे.

आणखी एक झटका देण्याच्या तयारीत Elon Musk, सर्व Twitter युजर्सना द्यावा लागणार सब्सक्रिप्शन चार्ज ?
ट्विटरची सूत्रे हाती घेतल्यानंतर मस्क ज्या वेगाने टाळेबंदी करत नवीन आदेश देत आहेत, त्याच वेगाने त्यांची संपत्तीही कमी होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला मस्कची एकूण संपत्ती २२३.८ अब्ज डॉलर इतकी होती. पण आता गेल्या दोन दिवसांत मस्कच्या संपत्तीत सुमारे १० अब्ज डॉलरची घट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

विदेशी टेक कंपन्या भारतीयांच्या मुळावर, ट्विटर कर्मचाऱ्यांचे ‘वाईट दिवस’, ९० टक्के नोकऱ्या गमावल्या
नियामक फाइलिंगमध्ये प्रदान केली माहिती
मस्क यांनी ऑगस्टनंतर पहिल्यांदाच त्यांच्या इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाच्या शेअर्सची ही विक्री केली आहे. मंगळवारी नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती देण्यात आली होती, पण हा व्यवहार पूर्वनियोजित होता, याचा उल्लेख त्यात नाही. पण गुंतवणूकदारांनी आधीच मस्क कंपनीच्या समभागांची अधिक विक्री करण्याची भीती व्यक्त केली होती. टेस्ला शेअर्स ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले असून ट्विटर डील झाल्यापासून त्यांच्यात घसरणीचा ट्रेंड सुरु आहे.

एप्रिलपासून ७० अब्ज डॉलरचे नुकसान
ट्विटर खरेदीचा कराराच्या सुरुवातीपासून जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक कार कंपनीचे शेअर्स घसरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. विशेष म्हणजे मस्कच्या संपत्तीचा मोठा भाग टेस्लामधील त्यांच्या सुमारे १५ टक्के भागामधून येतो, ज्याचे बाजार मूल्य ६२२ अब्ज डॉलर आहे. एप्रिल २०२२ मध्ये ट्विटर डील सुरू झाल्यापासून टेस्लाचे बाजार भांडवल (Tesla Inc. MCap) जवळपास निम्मे झाले आहे, तर मस्कची एकूण संपत्ती ७० अब्ज डॉलरने घसरली आहे. टेस्ला इंकचे शेअर्स शेवटच्या ट्रेडिंग दिवशी १९१.३० डॉलरच्या पातळीवर २.९३ टक्क्यांनी घसरून बंद झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here