मुंबई: गेल्या दोन महिन्यातील वाढीव वीज बिलामुळं हादरलेल्या मुंबईतील वीज ग्राहकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. ‘वाढीव वीज बिलाची अर्धीच रक्कम भरण्याची मुभा बेस्टनं ग्राहकांना दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तसा दावा केला आहे.

वाचा:

लॉकडाऊनच्या काळात मीटर वाचन करता न आल्यानं वीज कंपन्यांनी ग्राहकांना आधीच्या तीन महिन्यांच्या वीज बिलांची सरासरी काढून बिले पाठवली होती. अनलॉक सुरू झाल्यानंतर प्रत्यक्ष मीटर वाचन सुरू झाले व ग्राहकांना आधीच्या बिलाच्या फरकासह बिले पाठवण्यात आली. मात्र, अनेक ग्राहकांचा वीज वापर कमी नसतानाही त्यांना अव्वाच्या सव्वा बिले आली आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

वाचा:

मनसेकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन मनसेच्या शिष्टमंडळानं आज बेस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली व वाढीव वीज बिलाचा मुद्दा नजरेस आणून दिला. मनसेकडं आलेल्या तक्रारीची एक प्रतही अधिकाऱ्यांना देण्यात आली. मनसेचा मुद्दा योग्य असल्याचं अधिकाऱ्यांनी मान्य केलं. ज्या ग्राहकांना वाढीव वीज बिल आलं आहे, त्यांना सुधारीत बिल पाठवण्यात येईल. तसं न झाल्यास संबंधित ग्राहकांकडून वीज बिलाची अर्धी रक्कम स्वीकारली जाईल, असं आश्वासन प्रशासनानं मनसेला दिलं. मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक यांनी बेस्ट प्रशासनानं दिलेल्या या सवलतीची माहिती एका व्हिडिओ ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.

‘वाढीव वीज बिलाची अर्धी रक्कम ऑनलाइन न भरता चेकने द्यायची आहे. चेकच्या मागील बाजूस वीज ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांक लिहून तो डॉप बॉक्समध्ये टाकायचा आहे,’ अशी माहिती संदीप देशपांडे यांनी या भेटीनंतर दिली. कोणाचीही वीज जोडणी कापली जाणार नाही. लॉकडाऊनच्या काळात ज्यांना वीज बिल भरता आलेलं नाही, त्यांना ते हप्त्याने भरता येईल, असं आश्वासनही बेस्ट प्रशासनानं दिल्याची माहिती देशपांडे यांनी दिली आहे.

आता टेलिग्रामवरही आहे. लेटेस्ट बातम्या आता मोबाइलवरही मिळवा. फॉलो करण्यासाठी
.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here