वॉशिंग्टन: गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेतील टेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरकपात होताना दिसून येत आहे. ट्विटर आणि मेटा सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यासोबतच इतरही अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये लोकांना कामावरून काढले जाऊ शकते, अशी बातमी आहे. आयटी तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्यामुळे भारतासाठी चांगली संधी निर्माण होऊ शकते. यामुळे भारतीय टेक टॅलेंटसाठी येता काळ फायद्याचा ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पुढील १२ महिन्यांत भारतात मंदी येऊ शकते; सीईओंनी व्यक्त केली भीती
भारतासाठी ही संधी
आयटी तज्ज्ञांनी सांगितले की अमेरिकेतील आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गमावल्याचा फायदा भारताला होऊ शकतो, कारण अनेक अमेरिकन कंपन्या त्यांचे प्रकल्प ऑपरेशन भारतात हलवू शकतात. विशेषत: या कंपन्या नावीन्यपूर्ण आणि संशोधन आणि विकासाशी संबंधित प्रकल्प भारतात आणू शकतात. यामुळे केवळ अमेरिकन कंपन्यांच्या खर्चात कपात होणार नाही, तर भारताला तंत्रज्ञान क्षेत्रातील नवीन व्यवसाय आणि नोकऱ्यांच्या संधीही मिळू शकतात.

डॉलरने अख्ख्या जगाच्या खिशाला कात्री लागणार? रुपयासह इतर चलने घसरली, जगाची चिंता वाढली
या कंपन्यांमध्ये नोकर कपात
अमेरिकेत गूगल आणि ॲमेझॉनने नवीन भरतीवर बंदी घातली आहे. ट्विटरनंतर, मेटामध्येही नोकरकपातीचा अंदाज आहे. याशिवाय लिफ्ट, स्ट्राइप या कंपन्यांमध्येही मोठी नोकरकपात सुरू आहे. नेटफ्लिक्समध्येही लोकांचा पगार कमी केल्याची चर्चा आहे. याचा फायदा भारताच्या टेक टॅलेंटला होईल आणि देशाला अपस्किलिंगमध्ये फायदा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

वाढते व्याजदर, महागाईमुळे अमेरिकेची मंदीच्या दिशेने वाटचाल; GDP फक्त ०.५% राहण्याचा फिचचा अंदाज
भारतात, BYJU सारख्या अनेक टेक कंपन्यांनीही त्यांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. या आयटी कंपन्यांकडून ऑफर लेटर मिळाल्यानंतरही अनेक फ्रेशर्स ऑनबोर्डिंगच्या प्रतीक्षेत आहेत. जगभरातील मंदीचा भारतीय टेक कंपन्यांच्या ऑर्डर फ्लोवरही परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन कंपन्या कॉस्ट कटिंगसाठी भारताकडे वळू शकतात आणि यामुळे आयटी नोकरदारांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here