Crime News: आसामच्या गुवाहाटीत कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी ९८.६८ लाख किमतीच्या परदेशी सिगारेट्स जप्त केल्या आहेत. एकूण ४ लाख ९३ हजार ४०० सिगारेट्स कस्टमनं ताब्यात घेतल्या आहेत. कुरियरच्या माध्यमातून सिगारेट्सची तस्करी केली जात होती. एका वाहनातून सिगारेट्स नेल्या जात होत्या.

 

guwahati custom
गुवाहाटी: आसामच्या गुवाहाटीत कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी ९८.६८ लाख किमतीच्या परदेशी सिगारेट्स जप्त केल्या आहेत. एकूण ४ लाख ९३ हजार ४०० सिगारेट्स कस्टमनं ताब्यात घेतल्या आहेत. कुरियरच्या माध्यमातून सिगारेट्सची तस्करी केली जात होती. एका वाहनातून सिगारेट्स नेल्या जात होत्या. त्याची गोपनीय माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे कस्टमनं कारवाई केली. परदेशी सिगारेट्सचं बुकिंग ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडच्या माध्यमातून करण्यात आलं होतं.

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कस्टम विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी तातडीनं पोहोचले. एडब्ल्यूबी नंबरच्या आधारे सिगारेट पॅकेट शोधून काढण्यात आले. एडब्ल्यूबीच्या अंतर्गत एकूण ५ पॅकेट बुक करण्यात आले होते. प्रत्येक पॅकेटचा तपास करण्यात आल्यानंतर परदेशी सिगारेट सापडल्या. चीन आणि कोरियात तयार करण्यात आलेल्या विन आणि ईएसएसई लाईट ब्रँडच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत २९ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढले, अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले; महिलेसोबत भयंकर घडले
सर्व पॅकेट्स डॅमेज्ड फ्रॅबिक गारमेंट्स घोषित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. परदेशी सिगारेट्सची तस्करी करणारं वाहन रस्त्यात थांबवून अधिकाऱ्यांनी झडती घेतली. या वाहनात अधिकाऱ्यांना सिगारेट्स सापडल्या. एका व्यक्तीला पकडण्यात यश आलं, तर एक जण पळून गेला, असं अधिकाऱ्यानं सांगितलं.
मी स्वर्गात जाणार की नरकात? गुगल सर्च केलं, रिझल्ट पाहिला अन् अख्खा कुटुंबाला संपवलं
आणखी एका कारवाईत एका मोठ्या स्टिल ट्रंकसह ८ पॅकेज ताब्यात घेण्यात आले. ३ लाख ४५ हजार ४०० सिगारेट्स जप्त करण्यात आल्या. त्याचं मूल्य ६९ लाख ८ हजार रुपये आहे. गुवाहाटी कस्टम विभागानं मंगळवारी दोन मोठ्या कारवाया केल्या. दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण ९८ लाख ६८ हजार रुपयांच्या ४ लाख ९३ हजार ४०० परदेशी सिगारेट्स जप्त करण्यात आल्या. काही दिवसांपासून गुवाहाटी कस्टम विभागानं परदेशी सिगारेट्सविरोधात मोठी मोहिम हाती घेतली आहे. २९ कारवायांमध्ये कस्टम विभागानं ४५ लाख ५४ हजार ६२७ सिगारेट्स जप्त केल्या आहेत. त्यांचं मूल्य ७ कोटी ३५ लाख ५६ हजार ६८० रुपये इतकी आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here