मुंबई: दिवंगत-ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचा हजारो कोटींचा पोर्टफोलिओ त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी हाताळला आहे. राकेश झुनझुनवाला यांचे या वर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले होते. यानंतर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये प्रथमच मोठा बदल करण्यात आला आहे. रेखा झुनझुनवाला यांनी सप्टेंबर तिमाहीत सहा कंपन्यांचे शेअर्स खरेदी केले आहेत. तसेच यापैकी पाच कंपन्यांमध्ये त्यांनी आपली हिस्सेदारी वाढवली आहे. यासोबतच त्याच्या पोर्टफोलिओमध्ये नवीन स्टॉकचा समावेश करण्यात आला आहे.

टायटनमधील भागीदारी वाढली
रेखा झुनझुनवाला यांची टाटा समूहाची कंपनी , टायटनमधील हिस्सेदारी वाढली आहे. टायटन कंपनीतील त्यांचा हिस्सा सप्टेंबर तिमाहीपूर्वी १.०७ टक्के होता, जो आता १.६९ टक्के झाला आहे. त्याचवेळी राकेश झुनझुनवाला यांची टायटनमध्ये होल्डिंग ३.८५ टक्के आहे. एकूणच झुनझुनवाला दाम्पत्याची टायटन कंपनीमध्ये ५.१ हिस्सेदारी आहे. टायटन कंपनीने सप्टेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर विक्रीत १८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

एलन मस्कचे मोठे नुकसान! टेस्लाचे कोट्यवधीचे शेअर्स विकण्याची वेळ; Twitter डील महागात पडली
सिंगर इंडिया मधील शेअर्स खरेदी
बीएसईवर कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांनी सिंगर इंडियामध्ये ४२,५०,००० किंवा ७.९१ टक्के शेअर्स खरेदी केले आहेत. आदल्या दिवशी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ झाली होती. कंपनीचे मार्केट कॅप अंदाजे रु. ३७४.९४ कोटी आहे. १८५१ मध्ये स्थापन झालेल्या सिंगर इंडियाचे दोन प्रमुख व्यवसाय म्हणजे शिवणकाम आणि घरगुती उपकरणे आहे.

टाटा कम्युनिकेशन्स
रेखा झुनझुनवाला डिसेंबर २०२० पासून टाटा कम्युनिकेशनमध्ये गुंतवणूक करत आहेत. सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांनी कंपनीतील आपला हिस्सा ०.५३ टक्क्यांवरून १.६१ टक्के किंवा ४,५७५,६८७ इक्विटी शेअर्सवर वाढवला.

गुंतवणूकदार होणार मालामाल! दोन कंपन्या देणार बक्कळ बोनस, तुमच्याकडे आहेत का हे शेअर्स
टाटा मोटर्स
दिवंगत राकेश झुनझुनवाला यांनी सप्टेंबर २०२० च्या तिमाहीत टाटा मोटर्सचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश केला होता. त्यांची पत्नी रेखा यांनी सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीत कंपनीतील तिची हिस्सेदारी १.०९ टक्क्यांवरून १.११ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.

फोर्टिस हेल्थकेअर
रेयाशिवाय खा झुनझुनवाला यांनी सप्टेंबर २०१७ च्या तिमाहीत फोर्टिसमध्ये पहिली गुंतवणूक केली होती. पण डिसेंबर २०२० च्या तिमाहीत त्याने आपले सर्व शेअर्स विकले. त्यांनी Q2FY23 मध्ये पुन्हा एकदा फोर्टिसचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश केला आहे. एकूणच ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत रेखा यांच्याकडे कंपनीत ९,२०२,१०८ शेअर्स किंवा १.२२ टक्के हिस्सा होता.

कामाची बातमी! ५०० रुपयांहून कमी किमतीचे शेअर्स, तब्बल ५० टक्के परतावा मिळण्याची शक्यता
एनसीसी
रेखा झुनझुनवाला यांची एनसीसीमध्ये २०१५ पासून भागीदारी आहे. सप्टेंबरच्या तिमाहीत त्यांनी कंपनीतील त्यांची हिस्सेदारी 0.16 टक्क्यांनी वाढवली. याआधी त्यांची कंपनीतील भागीदारी १२.४८ टक्के होती, जी आता १२.६४ टक्के झाली आहे.

किती कोटींचा पोर्टफोलिओ
सप्टेंबर २०२२ च्या तिमाहीच्या शेवटी राकेश झुनझुनवाला यांचा पोर्टफोलिओ ३३,२२५.७७ कोटी रुपये होता. आपल्या निधनापूर्वी राकेश झुनझुनवाला स्वतःचा आणि पत्नीचा पोर्टफोलिओ सांभाळायचे. पण झुनझुनवालांच्या निधनानंतर त्यांचे शेअर्स आणि मालमत्ता त्यांच्या कुटुंबीयांकडे हस्तांतरित करण्यात आली. तेव्हापासून रेखा झुनझुनवाला स्वतःच्या आणि पतीच्या पोर्टफोलिओमध्ये बदल करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here