वाचा:
पुण्यातील रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना समजावण्यासाठी स्वारगेट चौकात एक प्रतिकात्मक यम रेडा घेऊन अवतरला आहे. तुम्ही घरात बसा, अन्यथा माझ्या सोबत यायला तयार रहा, असं आवाहन हे यमराज करत आहेत. चौकात येणार्या दुचाकी आणि चार चाकी वाहन चालकांचे प्रतिकात्मक यमाकडून आज प्रबोधन करण्यात आले. सहायक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर यांनी याबाबत माहिती दिली. ‘पुणे शहरात दहा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र काही नागरिक विनाकारण फिरताना दिसत आहे. त्यामुळं आम्हाला प्रतिकात्मक यम आणि रेडा चौकात आणून अशा नागरिकांचं प्रबोधन करावं लागत आहे,’ असं बाबर म्हणाले. ‘नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच राहावे,’ असं आवाहनही त्यांनी केलं.
वाचा:
प्रतिकात्मक यम बनलेल्या सुजय खरात यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘ आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. आतापर्यंत पुणेकर नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना चांगले सहकार्य केले आहे. मात्र काही नागरिक नियम पाळताना दिसत नाहीत. अशा नागरिकांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागले आहे. नागरिकांनी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या जिवाची काळजी घेऊन घरात बसावे, अन्यथा माझ्या सोबत येण्यास तयार रहावे’, असा सल्ला त्यांनी दिला.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times