Sanjay Raut Gets Bail: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. राऊत यांच्या जामिनाला सक्तवसुली संचलनालयानं विरोध केला. मात्र न्यायालयानं त्यांना जामीन दिला आहे. राऊत १०२ दिवसांपासून तुरुंगाबाहेर येतील.

 

raut aditya
मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना पीएमएलए न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. राऊत यांच्या जामिनाला सक्तवसुली संचलनालयानं विरोध केला. मात्र न्यायालयानं त्यांना जामीन दिला आहे. राऊत १०२ दिवसांपासून तुरुंगाबाहेर येतील. तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. अखेर आज कोर्टानं त्यांना आज जामीन मंजूर केला.

आदित्य ठाकरेंनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. आज प्रत्येक शिवसैनिकाला आनंद झाला आहे. हा निर्णय लोकशाहीसाठी चांगला असल्याची प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली. ‘सरकारविरोधात बोलल्यानंतर आता चौकशीचा ससेमिरा लावला जातो. तुरुंगात टाकण्याच्या धमक्या दिला जातात. सत्य बोलणाऱ्यांना, प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. मात्र संजय राऊत डरपोक नाहीत. ते पळून गेले नाहीत. तपास यंत्रणांना, कारवाईला सामोरे गेले. कारण संजय राऊत लढवय्ये नेते आहेत,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ठाकरे गटाचा हुकमी एक्का तुरुंगातून बाहेर येणार; १०० दिवसांनी संजय राऊतांना जामीन मंजूर
संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आनंद व्यक्त केल्या. टायगर इज बॅक असं ट्विट त्यांनी केलं. वाघाला फार वेळ पिंजऱ्यात कोंडून ठेवता येत नाही. तो बाहेर येतोच, अशा शब्दांत अंधारेंनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. गेल्या तीन महिन्यांत आम्हाला खूप वेळा संजय राऊत यांची उणीव जाणवली. माझं भाषण ऐकून अनेकजण लेडी संजय राऊत म्हणाले. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. शिवसेनेचं कुटुंब आज खूप आनंदात आहे, असं अंधारे म्हणाल्या. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here