पुणे : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड यांचा आज शपथविधी पार पडला आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर गावचे आहेत. कनेरसर हे दलित पँथरचे संस्थापक आणि विद्रोही कवी नामदेव ढसाळ यांचेही मूळ गाव आहे. धनंजय चंद्रचूड हे पुण्याबाहेर गेले तरी त्यांनी नेहमीच गावातील लोकांशी बांधिलकी जपली आहे. कामानिमित्त ते गावाला भेट देत असतात. गावातील वाडाही त्यांनी तसाच जपून ठेवला आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ५० वर्षापूर्वी शिक्षणासाठी गाव सोडले होते. त्यानंतर ते पुण्यात स्थायिक झाले. कनेरसर येथे त्यांचा वाडा आहे. या ठिकाणी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या नातलग सुनंदा चंद्रचूड राहत आहेत. २०१६ साली कनेरसर येथे धनंजय चंद्रचूड एका कार्यक्रमानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी या वाड्याला भेट दिली.

राऊतांना जामीन मिळताच ‘मातोश्री’वरुन फोन; उद्धव ठाकरे म्हणाले, संजय…

धनंजय चंद्रचूड हे सरन्यायाधीश होणार, ही बाब कनेरसर गाव तसंच खेड तालुका व पुणे जिल्ह्यातील नागरिकांची मान अभिमानाने उंचावणारी आहे.

धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड यांनी सर्वाधिक काळ भारताचे सरन्यायाधीशपद भूषवलं आहे. त्यांचे आजोबा विष्णू चंद्रचूड हे १९१२ साली एलएलबी परीक्षेत राज्यात प्रथम आले होते. त्यानंतर यशवंतराव चंद्रचूड हे १९४२ साली व त्यांच्या मुलीने १९७१ साली एलएलबी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. कनेरसर गावच्या चंद्रचूड घराण्याची आगळीवेगळी ‘हॅट्रिक’ म्हणून याकडे पाहिले जाते.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात धनंजय चंद्रचूड यांना सरन्याधीशपदाची शपथ दिली असून देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पित्यानंतर पुत्रही सरन्यायाधीश म्हणून काम पाहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here