सिंधुदुर्ग- मुंबईतून बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा मृतदेह कणकवलीतील एका लॉजिंगच्या बंद खोलीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या व्यक्तीचा कणकवली पोलीस शोध घेत होते. मात्र लॉजिंग कर्मचाऱ्याने चुकीची माहिती दिल्याने पोलिसांची दिशाभूल झाली. परिणामी सदर व्यक्तीचा शोध लागायला खूपच उशीर झाला.

मुंबईहून बेपत्ता झालेल्या होलसेल दुकानातील सेल्समनचा मृतदेह कणकवलीतील एका लॉजिंगच्या बाथरूममध्ये आढळून आला. मात्र या लॉजिंग कर्मचाऱ्याकडून याबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मुंबईपासून ते कणकवलीपर्यंत पोलीस व अन्य सामाजिक कार्यकर्तेदेखील या बेपत्ता झालेल्या सेल्समन राजेंद्र प्रभाकर सावंत यांच्या शोधात मंगळवारी रात्री उशिरापर्यंत राहिले.

टॉवर लोकेशनद्वारेदेखील राजेंद्र सावंत (वय 50) यांचा कणकवली पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. या कामासाठी स्वतः पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर फिल्डवर उतरले. अखेरीस राजेंद्र सावंत यांच्या नातेवाईकांनी लॉजिंगमधील रजिस्टरमध्ये पुन्हा शोध मोहीम राबवली. आणि त्यात कणकवलीतील एका लॉजिंगमध्ये राजेंद्र सावंत आले होते हे स्पष्ट झाले.
इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स वाढले, अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले; महिलेसोबत भयंकर घडले
पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ राजापूर तालुक्यातील असलेले सध्या मुंबई अंधेरी येथे राहत असलेले राजेंद्र प्रभाकर सावंत हे सोमवारी मुंबईहून बेपत्ता झाले ते मंगळवारी सकाळी कणकवलीत तुतारी एक्स्प्रेसने उतरले. त्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील पोलिसांना मिळाले. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र शोध लागत नसल्याने पोलिसात धाव घेतली. मुंबईमध्ये त्यांच्या मोबाईलचे टॉवर लोकेशन कणकवलीमध्ये आढळले. मुंबई पोलिसांनी त्यांचे कणकवलीमधील लोकेशन सांगितल्यामुळे त्यांचे राजापूरमधील काही कुटुंबीय मंगळवारी सायंकाळी कणकवलीमध्ये दाखल झाले.
भयंकर! भयानक!! १३७८ कॉल्स, अश्लिल व्हिडीओ; लेकीनं आईच्या प्रियकराला निर्घृणपणे संपवलं
राजेंद्र सावंत बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी उशिरा कणकवली पोलिसांना दिली व त्यांच्या लोकेशन संदर्भातदेखील माहिती दिली. त्यानंतर कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी याबाबत खातरजमा करत आचरा रोडवर त्यांच्या दाखवत असलेल्या टॉवर लोकेशनद्वारे शोधाशोध केली. टॉवर लोकेशनच्या आसपास अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवून देखील राजेंद्र सावंत यांचा शोध लागत नसल्याने पोलीस देखील हैराण झाले होते. तत्पूर्वी सायंकाळच्या सुमारास कणकवलीतील काही लॉजिंगमध्येदेखील पोलीस व राजेंद्र सावंत यांच्या कुटुंबियांनी जाऊन त्यांचा फोटो दाखवत चौकशी केली होती. ज्या लॉजिंगमध्ये त्यांचा मृतदेह सापडला, तिथे लॉजिंगवर असलेल्या कर्मचाऱ्याने ही व्यक्ती आली नसल्याचे पहिल्यांदा सायंकाळी सांगितले. दरम्यान याच लॉजिंगमध्ये उशिरा पुन्हा चौकशी केल्यानंतर राजेंद्र सावंत यांच्या नावाची नोंद सकाळच्या सुमारास केल्याचे आढळले.
बायकोचं अफेयर, ती मला मारते, धमकावते! व्हिडीओ शूट करून हॉटेल मालकानं टोकाचं पाऊल उचललं
ही खात्री झाल्यानंतर त्यांनी घेतलेली रूम नंबर चेक करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय गेले असता त्या रूमला कुलूप लावलेले आढळले. यावेळी त्यांनी सदर बाब पोलिसांना कळवली. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अगोदर कॉमन असलेल्या बाथरूमचा दरवाजा तोडून राजेंद्र सावंत यांचा मृतदेह बाहेर काढला. तसेच त्या रूममधील कुलूप उघडून खात्री केली असता राजेंद्र सावंत यांची बॅग,कपडे, पैशांचे पाकीट, आधार कार्ड व अन्य वस्तू तेथे आढळल्या. यानंतर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. याबाबत अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here