मुंबई: प्रेयसीवर वाईट नजर टाकणाऱ्या मित्राला मित्रानंच निर्घृणपणे संपवल्याची घटना भिवंडीत घडली आहे. भिवंडीत वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय अस्लम अन्सारीनं त्याचा हॉटेल मालक मित्र शमीम अन्सारीला क्रूरपणे ठार केलं. या प्रकरणातील घटनाक्रम आणि हत्येची पद्धत ऐकून पोलिसदेखील हादरले. अस्लमनं शमीमचं गुप्तांग कापून त्याच्याच तोंडात टाकलं. यानंतर त्यानं शमीमवर चाकूनं सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या शमीमचा मृत्यू झाला.

भिवंडी पोलिसांनी आरोपी अस्लम अन्सारीला अटक केली आहे. शमीम अन्सारी आपला बालपणीपासूनचा मित्र असल्याचं अस्लमनं पोलिसांना सांगितलं. शमीमच्या अनेक प्रेयसी होत्या. मात्र तरीही तो अस्लमच्या प्रेयसीजवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. तुझी प्रेयसी आवडत असल्याचं, तिच्यात रस असल्याचं शमीमनं अस्लमला सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. तू थांबला नाहीस, तर परिणाम वाईट होतील, अशी धमकी अस्लमनं शमीमला दिली होती.
उगाच लागली २५ कोटींची लॉटरी, फुकटचा त्रास नुसता! आधी आनंदात नाचलेला तो आता पुरता वैतागला
मारहाण केल्यानंतर, धमकी दिल्यानंतरही शमीम ऐकला नाही. म्हणून त्याला संपवल्याचं आरोपी अस्लमनं पोलिसांना सांगितलं. तुझ्या ४-५ गर्लफ्रेंड आहेत. त्यामुळे माझ्या गर्लफ्रेंडकडे वाईट नजर टाकणं सोड, असं अस्लमनं शमीमला वारंवार सांगून पाहिलं. त्यामुळे अस्लमनं शमीमची निर्घृणपणे हत्या केली. अस्लमनं शमीमचं गुप्तांग कापलं आणि ते त्याच्यात तोंडात कोंबलं. हा घटनाक्रम ऐकून पोलीस हादरले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here