
२००० वर्ष जुना खजिना सापडला, पुरातत्वशास्त्रज्ञांचे डोळे चकाकले
हेही वाचा –बँकेतून फोन आला, तुमच्या खात्यात १०० मिलियन जमा झाले, पोलीस अधिकाऱ्याला धक्का
संस्कृती मंत्रालयाचे उच्च अधिकारी मॅसिमो ओसाना यांनी या शिल्पांच्या शोधाचे वर्णन प्राचीन भूमध्य सागराच्या इतिहासातील सर्वात आश्चर्यकारक शोधांपैकी एक असं केलं आहे. रियास ब्राँझच्या शोधानंतर ओसानाने याचे वर्णन केले आहे. त्या काळात प्राचीन ग्रीक योद्ध्यांची एक मोठी जोडी सापडली होती. १९७२ मध्ये ते इटलीतील समुद्रकिनाऱ्यावरून काढण्यात आले होते.
तबोली म्हणाले की, हायजिया, अपोलो आणि इतर ग्रीक-रोमन देवतांच्या या मूर्ती पूर्वी मंदिरांमध्ये होत्या. पण असे दिसते की पहिल्या शतकातच धार्मिक विधीमध्ये त्या मूर्ती गरम पाण्यात विसर्जित करण्यात आल्या असाव्या. त्या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या होत्या कारण त्यांना पाण्यातून काहीतरी मिळेल अशी अपेक्षा होती.

२००० वर्ष जुना खजिना सापडला, पुरातत्वशास्त्रज्ञांचे डोळे चकाकले
संस्कृती मंत्रालयाने सांगितले की, तो प्राचीन टस्कनीमध्ये मोठ्या बदलांचा काळ होता. कारण, याच काळात एट्रस्कन राजवट कोसळत होती आणि रोमन राजवट सुरू झाली होती.
हेही वाचा –अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाला, आकाशातून घरावर पडला आगीचा गोळा; काय घडलं त्या रात्री?
तबोली यांनी सांगितले की, या मूर्ती सुमारे ६ हजार कांस्य, चांदी आणि सोन्याच्या नाण्यांनी मढवल्या गेल्या होत्या. सॅन कॅसियानोच्या घाणेरड्या गरम पाण्याने त्यांचे जतन करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांनी सांगितले की, त्यांच्या टीमला २४ मोठे शिल्प सापडले आहेत. याशिवाय, पितळेपासून बनवलेली इतरही अनेक छोटी शिल्पे सापडली आहेत.
ठाकरेंच्या लेडी राऊत वंचितमध्ये प्रवेश करणार होत्या, सुषमा अंधारेंनी सांगितली वंचितची फिस्कटलेली गोष्ट