ट्विटर अशा गोष्टी करत राहील
इलॉन मस्कने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘कृपया लक्षात घ्या की येत्या काही महिन्यांत ट्विटर अनेक गमतीजमती करणार आहे. जे कामाचे आहे ते आम्ही ठेवू, जे कामाचे नसेल ते बदलले जाईल.’ यावरून ऑफिशियल बॅज थोड्या काळासाठी ट्विटरवर आणणे हा एलोन मस्कचा प्रयोग होता हे यावरून स्पष्ट झाले आहे. जेव्हा मस्कला वाटले की याचा काही उपयोग नाही, तेव्हा त्यांनी ते काढून टाकले.
मस्क यांनी मागे घेतला ऑफिशियल बॅज
आपण आताच ऑफिशियल बॅज मागे घेतला असे एका ट्विटर यूजरला उत्तर देताना मस्क यांनी म्हटले आहे. ट्विटरवर दिसणारा ऑफिशिय बॅज आता दिसत नाही आहे असे एका ट्विटर यूजरने ट्विट केले होते. यास उत्तर देताना एलन मस्क म्हणाले की मी तो नुकताच किल केला आहे.

पंतप्रधान मोदी
हे लेबल बर्याच लोकांच्या प्रोफाइलवर दिसून आले
बुधवारी रात्री जगभरात मोठ्या संख्येने व्हेरिफाइड अकाउंटवर ऑफिशियल लेबल दिसू लागले. पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत हे लेबल गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इतर काही मंत्री यांच्या ट्विटर हँडलवर दिसून आले आहे. ट्विटरचे अधिकारी एस्थर क्रॉफर्ड यांनी ट्विटरवर लिहिले, “बर्याच लोकांनी विचारले आहे की ते निळ्या रंगाच्या टिक्स आणि ऑफिशियली व्हेरिफाइड अकाउंट असलेल्या ट्विटर ब्लू ग्राहकांमध्ये कसे फरक करणार. म्हणूनच आम्ही काही अकाउंटसाठी ‘ऑफिशियल’ लेबल सादर करीत आहोत. अगोदरपासूनच सर्व व्हेरिफाइड अकाउंटना ‘ऑफिशियल’ लेबल मिळणार नाहीत.’
ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन
ट्विटरचे मालक झाल्यानंतर, एलन मस्क यांनी ब्लू टिकसाठी दरमहा ८ डॉलरची योजना सुरू केली आहे. क्रॉफर्ड म्हणाले की नवीन ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनमध्ये आयडी व्हेरिफिरेशनचा समावेश नाही. त्यांनी स्पष्ट केले की ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शन एक ऑप्ट-इन, पेड सबस्क्रिप्शन आहे. हे वापरकर्त्यास निळा चेकमार्क आणि काही वैशिष्ट्ये देते. यामध्ये, वापरकर्ते कमी जाहिराती, प्रत्युत्तर देण्याला प्राधान्य आणि मोठे व्हिडिओ पोस्ट करण्यासारख्या वैशिष्ट्यांचा फायदा घेऊ शकतात. क्रॉफर्ड म्हणाले की, कंपनी अकाउंट्समध्ये फरक कायम ठेवण्यासाठी प्रयोग करत राहील.