Pune News : सय्यद याच्या डोक्यात कोवेने दगड मारुन मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सय्यदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करीत आहेत.

 

Pune News
Pune News : दारु पिताना क्षुल्लक कारणावरुन दोघांमध्ये वाद; मित्रानेच केला मित्राचा घात
पुणे : दारु पिताना झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. अख्तर सय्यद (वय ३९, रा. बाजारतळाजवळ, कुंजीरवाडी, ता. हवेली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अंकुश रामराव कोवे (वय ३०, रा. नागझरी, ता. किनवट, जि. नांदेड) याला अटक करण्यात आली आहे. सय्यदची पत्नी जस्मिन (वय ३५) हिने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सय्यद आणि कोवे यांची मैत्री होती. दोघे जण मजुरी करत होते. दोघे जण सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरातील एस. के. वाइन्स दुकानाशेजारी रात्री दारु पीत होते. किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने दोघांमध्ये हाणामारी झाली.

प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा; नीरव मोदींची याचिका न्यायालयाने फेटाळली
सय्यद याच्या डोक्यात कोवेने दगड मारुन मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या सय्यदला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करत आहेत.

राऊत सुटले, पण कोर्टाने त्यांना सोडताना जे सांगितलं त्याने ठाकरेंनाही हत्तीचं बळ मिळालं

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here