पुणे : पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एका एसीपीच्या मुलाने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याच्या कारणातून मैत्रिणीचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ बनावट खाते तयार करत त्यावरून शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अमेय दबडे (रा. टिळेकर नगर, कोंढवा बुद्रुक) याच्याविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २५ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी अमेय दबडे हे कोकणात असताना एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यानंतर पुढील शिक्षणसाठी ते पुणे येथे आले. मात्र पुण्यात आल्यानंतर संबंधित तरुणीने त्या तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. आधी दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याने अमेय याला तरुणीच्या सोशल मीडिया अकाऊंटचे आयडी आणि पासवर्ड माहीत होते. त्याचाच गैरफायदा घेत आरोपी अमेय याने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे काही न्यूड फोटो शेअर केले. तसंच तिच्या नावाने फेक अकाऊंट तयार करून तिचा नंबर त्या अकाऊंटवर शेअर केला.

Pune News : दारु पिताना क्षुल्लक कारणावरुन दोघांमध्ये वाद; मित्रानेच केला मित्राचा घात

आरोपीच्या या कृत्यानंतर पीडित तरुणीला अनेक अश्लील संभाषणाचे फोन येऊ लागले. तिने स्वत:चं अकाऊंट चेक केल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला. त्यानंतर तरुणीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली.

दरम्यान, सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास लोणी काळभोर पोलिसांकडे सोपवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत. आरोपीचे वडील हे पोलीस खात्यातून काही दिवसांपूर्वीच निवृत्त झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here