ED granted bail to Sanjay Raut | पत्राचाळ प्रकरणातही संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील, असे अनेक इशारेही मोहित कंबोज यांनी दिले होते. त्यांचे हे भाकीत खरेही ठरले होते. परंतु, संजय राऊत तुरुंगात गेल्यापासून मोहित कंबोजही फारसे चर्चेत नव्हते, ते लाईमलाईटपासून दूर होते. परंतु, बुधवारी संजय राऊत यांनी तुरुंगाबाहेर पाऊल ठेवताच मोहित कंबोज यांनी ट्विट करुन पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत.

हायलाइट्स:
- मला पुन्हा पुन्हा अटक करण्याचा प्रयत्न होईल
- कितीदा अटक केली तरी मी शिवसेना त्यागणार नाही
राज्यात सत्तांतर होण्यापूर्वीपासूनच संजय राऊत आणि मोहित कंबोज यांच्याकडून एकमेकांवर अनेकदा आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. संजय राऊत यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करण्यात मोहित कंबोज हे कायमच आघाडीवर होते. काही महिन्यांपूर्वी मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांनी माझ्याकडून २५ लाख रुपये उकळल्याचा आरोप केला होता. यानंतर पत्राचाळ प्रकरणातही संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील, असे अनेक इशारेही मोहित कंबोज यांनी दिले होते. त्यांचे हे भाकीत खरेही ठरले होते. परंतु, संजय राऊत तुरुंगात गेल्यापासून मोहित कंबोजही फारसे चर्चेत नव्हते, ते लाईमलाईटपासून दूर होते. परंतु, बुधवारी संजय राऊत यांनी तुरुंगाबाहेर पाऊल ठेवताच मोहित कंबोज यांनी ट्विट करुन पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा, असे मोहित कंबोज यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी,’अजूनही हिशेब पूर्ण झालेला नाही, आणखी काही प्रकरणांमध्ये राऊत यांची चौकशी होणे गरजेचे आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा संजय राऊत विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मला कितीवेळाही अटक करा,पण शिवसेना सोडणार नाही: संजय राऊत
संजय राऊत यांनी बुधवारी रात्री आपल्या भांडूप येथील निवासस्थानी छोटेखानी सभा घेतली होती. यावेळी त्यांनी ईडी आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र डागले होते. ठाकरे सरकार पाडण्यासाठी मला अटक करण्याचे आदेश दिल्लीतून देण्यात आले होते. आज न्यायालयाने माझी अटक बेकायदेशीर ठरवली. त्यानंतर ईडीने उच्च न्यायालयात धाव घेतली. मला कितीवेळाही अटक करा, पण मी शिवसेनेला त्यागणार नाही. मी भगवा घेऊनच जन्माला आलोय, या भगव्याबरोबरच जाईन, असे संजय राऊत यांनी म्हटले. मला चिरडणं किंवा संपवणं इतकं सोपं नाही. हे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेलं रसायन आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.