बिहार : देशात गुन्ह्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना आता आणखी एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कारण एका कुटुंबाने एकत्रच मृत्यूला कवटाळले आहे. केदारलाल गुप्ता यांनी बुधवारी रात्री उशिरा पत्नी आणि चार मुलांसह विष प्राशन केले. यामध्ये कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला, तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

ही घटना बिहारच्या नवादा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये घराचे प्रमुख केदार लाल गुप्ता, पत्नी अनिता कुमारी आणि तीन मुले प्रिन्स कुमार, शबनम कुमारी आणि गुडिया कुमारी यांचा समावेश आहे, तर मुलगी साक्षीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना प्रथम पवापुरी विन्स इथे रेफर करण्यात आले, मात्र नंतर नवाडा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथेही गंभीर स्थिती पाहता साक्षीला आता पाटणा इथे रेफर करण्यात आले आहे.

थंडीचा गैरफायदा घेत पहाटे सुरू होता धक्कादायक प्रकार, कार उघडताच पोलीस हादरले…
केदारलाल गुप्ता हे शहरातील विजय बाजारामध्ये फळांचे दुकान चालवायचे आणि त्यांच्यावर खूप कर्ज होते. कर्जामुळे त्याचा खूप छळ होत होता, त्यामुळे कंटाळून सर्वांनी शहरातील एका समाधीजवळ जाऊन विष प्राशन केले. यामध्ये कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विष प्राशन करण्यापूर्वी मुलाने बनवला व्हिडिओ….

केदारलाल गुप्ता यांचा मुलगा प्रिन्सन याने विष प्राशन करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, ‘बाजारातून काही लोकांकडून कर्ज घेतले आणि ते आम्हाला खूप त्रास देत होते. आम्ही पैसे परत करण्यासाठी थोडा वेळ मागितला, पण लोक ते मानायला तयार नव्हते आणि वारंवार धमक्या देत होते. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी विष घेतले.

याचवेळी साक्षीने सांगितले की, पापा डिप्रेशनमध्ये होते, त्यांनी कर्ज घेतले होते, हे आम्हाला माहित नव्हते. कर्ज कोणाकडून घेतले? या प्रश्नाच्या उत्तरात साक्षीने मनीष भैय्याचे नाव घेतले. या घटनेनंतर पोलीस याप्रकरणी मौन बाळगून तपास करत असल्याची माहिती आहे.

पत्नी प्रियकरासह पळाली, खचलेल्या पतीने मुलीसह तिघांना गाडीत बसवलं अन्…; क्षणात झालं होत्याचं नव्हतं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here