मुंबई: करोना संकटात पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या आशा सेविकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच सरकारने घेतला होता. त्यासंदर्भात आज आरोग्य विभागानं निर्णय जाहीर केला आहे. १ जुलैपासून आशा सेविकांच्या मानधनात २ हजार तर गटप्रवर्तकांना दरमहा ३ हजार अशी वाढ करण्यात आली आहे. या महिन्यांपासूनच याची आंमलबजावणी होणार आहे. ( In Get A Pay Hike)

आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडून नियमीत ४ कामांसाठी प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल २००० रुपयांपर्यंत दरमहा तसेच गटप्रवर्तकांना दरमहा ३००० रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहे.

वाचाः

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका ७४ प्रकारचे विविध कामे करतात. त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो मात्र राज्य शासनाकडून २००० रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय २५ जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आग्रही भूमिका मांडली होती.

महाराष्ट्रात सध्या ६५ हजार आशासेविका आहेत. आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी १५७ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तशी तरतूदही करण्यात आली आहे.

वाचाः

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आशा वर्करच्या मोबदल्यात वाढ व्हावी अशी मागणी होत होती. करोना संकटाच्या काळात आशा सेविकांनी मोलाचा वाटा उचलला आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आशा सेविकांचा प्रश्न मांडला होता. यावर उपमुख्यमंत्र्यांनी या प्रश्नावर लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here