मुंबई: जागतिक बाजारातील संकेत आणि आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीतील कंपन्यांच्या चांगल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात गेल्या काही दिवसात चांगली तेजी नोंदवली गेली आहे. जगात मंदी सदृष्य वातावरण असताना, भारतीय बहुतांश कंपन्यांनी चांगले तिमाही निकाल जाहीर केले आहेत.

बाजाराचा ‘बुल’ घोड्या पेक्षा वेगाने धावणार! शेअर बाजाराबाबत महत्वाचं भाकीत!
बुधवारी(९ नोव्हेंबर) ला बँक निफ्टी निर्देशांकाने नवा विक्रम स्थापित केला. याशिवाय सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकातही सकारात्मक वातावरण आहे. दरम्यान, कंपन्यांच्या चांगल्या तिमाही निकालांमुळे अनेक शेअर्समध्ये ब्रोकरेज फर्म्सने गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्म शेअरखानने दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ५ दर्जेदार शेअर्सबाबत सल्ला दिला असून या शेअर्समध्ये गुंतवणुकीतून वर्षभरात चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

कोरोमंडल इंटरनॅशनल (Coromandel International)
ब्रोकरेज फर्म शेअरखानने कोरोमंडल इंटरनॅशनलच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. चांगल्या परताव्यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत ११५५ रुपये ठेवण्यात आली आहे. १० नोव्हेंबर २०२२ रोजी शेअरची किंमत ९४३ रुपये होती. या शेअर्समध्ये गुंतवणुकीनंतर गुंतवणुकदारांना प्रति शेअर २१२ रुपये म्हणजेच साधाराण २२ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

शेअर बाजारातील तेजीला आज ब्रेक; सेन्सेक्स २०० अंकांनी घसरून ६१ हजारांखाली, निफ्टीही घसरला
सिटी युनियन बँक (City Union Bank )
ब्रोकरेज फर्म शेअरखानने सिटी युनियन बँकेच्या शेअर्सच्या खरेदीचा सल्ला दिला आहे. उत्तम परताव्यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत २३० रुपये आहे. १० नोव्हेंबर २०२२ रोजी शेअरची किंमत १९० रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर ४० रुपये म्हणजेच साधार १७-१८ टक्के परतावा मिळू शकतो.

ब्लू स्टार (Blue Star)
ब्रोकरेज फर्म शेअरखानने ब्लू स्टारच्या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीनंतर चांगल्या परताव्यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत १४१० रुपये आहे. १० नोव्हेंबर 2022 रोजी शेअरची किंमत १२०० रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर २१० रुपये म्हणजेच साधारण
१६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओत मोठे बदल; पत्नीने खरेदी केले ६ कंपन्यांचे शेअर्स, तुमच्याकडे आहेत का?
जेके लक्ष्मी सिमेंट (JK Lakshmi Cement )
ब्रोकरेज फर्म शेअरखानने जेके लक्ष्मी सिमेंटच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीनंतर उत्तम परताव्यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत ७५० रुपये आहे. १० नोव्हेंबर २०२२ रोजी शेअरची किंमत ६५८ रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति शेअर ९०-९२ रुपये म्हणजेच साधारण १३ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank)
ब्रोकरेज फर्म शेअरखानने अ‍ॅक्सिस बँकेचे शेअर्स खरेदीचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य किंमत १०४० रुपये आहे. १० नोव्हेंबर २०२२ रोजी शेअरची किंमत ८४५ रुपये होती. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना १९५ रुपये प्रति शेअर म्हणजेच साधारण १९ टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here