Agriculture News in Beed : आधीच परतीच्या पावसानं (Rain) शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिकं परतीच्या पावसानं वाया गेली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. या अतिवृष्टीच्या तडाक्यातून काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहेत. अशातच बीड (Beed) जिल्ह्यामध्ये तुरीचे (Tur) पीक फुलोऱ्यात आलं असतानाच या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सध्या बीड जिल्ह्यामध्ये तुरीचं पीक फुलोऱ्यात आलं आहे. या तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यावर्षी तुरीचे पीक अगदी जोमात आलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या उत्पन्नाची अपेक्षा आहे. मात्र, पिकं ऐन फुलोऱ्यात आलेल्या तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच मर रोगाचाही प्रादुर्भाव होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे.

अतिवृष्टीमुळं शेतात जास्त काळ पाणी राहिल्यानं रोगाचा प्रादुर्भाव

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीनं शेती पिकांना मोठा फटका बसला होता. त्यांची उभी पिकं वाया गेली होती. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला होता. कापूस, सोयाबीन, मका, भाजीपाला अशा पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीमळं शेतामध्ये जास्त काळ पाणी साचून राहिल्याने तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होत आहे. तसेच मर रोगाचाही प्रादुर्भाव होत असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान, तूर पिकाच्या खोडावर योग्य औषधाच्या फवारण्या केल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल, असे देखील कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे.

REELS

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी

सुरुवातीच्या काळात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, त्यानंतरच्या काळात म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली याचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. ऑक्टोबर महिन्यात देखील परतीच्या पावसानं काही जिल्ह्यांमध्ये पावसानं थैमान घातलं होतं. यामुळं देखील शेतकऱ्यांच्या हाती आलेली पिकं वाया गेली होती. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाला मोठा फटका बसला आहे. यातून देखील काही शेतकऱ्यांची पिकं वाचली आहे. या पिकांवर आता रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

पावसाने झोडपलं, शेतीचं नुकसान; पाणी पातळी वाढल्यानं बोअरवेल ओव्हरफ्लो, बीड-हिंगोलीचा पाणी प्रश्न मिटणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here