पुणे : पीएमपी ही पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे. वाढत्या शहरीकरणात आणि रहदारीत पीएमपी हा पर्याय पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मात्र, आता ग्रामीण भागातून पुण्यात पीएमपीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील ४० मार्गांपेक्षा अधिक मार्गांवरील सेवा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड हद्दीत पीएमपी कडून १२९० बस चालवण्यात येतात. शहराबाहेर पीएमपीचे १०४ मार्ग सुरु आहेत. दररोज १० ते १२ लाख प्रवासी पीएमपी मधून प्रवास करत असतात. शहरातील नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद बघता ही सेवा अपुरी पडत असल्याची ओरड अनेक दिवसांपासून आहे. तसेच ग्रामीण भागात पीएमपी तोट्यात चालली होती हे देखील या मार्गावरील पीएमपी सेवा बंद करण्याचे मुख्य कारण आहे.

तीन महिन्यांनी हातात घड्याळ बांधलंय, पण आता ते सैल होतंय: संजय राऊत
त्यामुळे पीएमपीच्या विद्यमान अध्यक्ष ओम प्रकाश बकोरिया यांनी एसटी महामंडळाला पत्र पाठवून पीएमपीच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या मार्गांवर एसटी सेवा सुरु करण्याची विनंती केली आहे. ही सेवा सुरु झाल्यानंतर पीएमपीचे हे मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात एसटीची सेवा देण्यासंदर्भात माझे एसटीच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. त्यांची सेवा सुरळीत झाल्यावर टप्प्याटप्प्याने आम्ही पीएमपीची ग्रामीण भागातील सेवा बंद करणार आहोत. पीएमपी प्रशासनाने सध्या तरी ग्रामीण मार्गावरील बस सेवा तात्काळ बंद न करता टप्प्याटप्प्याने बंद करावी अशी सूचना देण्यात आली आहे. अशी माहिती पीएमपीचे ओम प्रकाश बकोरिया यांनी दिली आहे.

धोनीमुळे जाणार विराटची विकेट? इंग्लंडनं आखला रनमशीन कोहलीला बाद करण्याचा मास्टरप्लान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here