Devendra Fadnavis | तुम्ही संजय राऊत यांना भेटणार का, असा प्रश्नही फडणवीस यांना विचारण्यात आला. तेव्हा फडणवीसांनी सांगितले की, मी सगळ्यांना चभेटतो. त्यांनी भेट मागितली तर मी भेटेन. त्यामध्ये काही अडचण नाही. एवढंच की, राजकारणातील कटुता दूर करायची असेल तर सगळ्यांना मिळून ठरवावे लागेल. कुठलाही एक पक्ष ही कटुता दूर करू शकत नाही.

हायलाइट्स:
- संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतील,असा अंदाज होता
- ऊत यांनी पहिल्या दिवशी तरी सरकारवर हल्लाबोल करणं टाळलं
तुम्ही संजय राऊत यांना भेटणार का, असा प्रश्नही फडणवीस यांना विचारण्यात आला. तेव्हा फडणवीसांनी सांगितले की, मी सगळ्यांनाच भेटतो. त्यांनी भेट मागितली तर मी भेटेन. त्यामध्ये काही अडचण नाही. एवढंच की, राजकारणातील कटुता दूर करायची असेल तर सगळ्यांना मिळून ठरवावे लागेल. कुठलाही एक पक्ष ही कटुता दूर करू शकत नाही. पक्षाच्या नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं, ही पद्धत बंद झाली पाहिजे. तरच राजकारणातील कटुता कमी होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
संजय राऊत हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतील,असा अंदाज होता. मात्र, राऊत यांनी पहिल्या दिवशी तरी सरकारवर हल्लाबोल करणं टाळलं आहे. तसंच शिवसेनेतील फुटीनंतर संजय राऊत ज्या भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका करत होते, त्याच फडणवीसांवर राऊत यांनी आता मात्र स्तुतीसुमने उधळल्याचं दिसत आहे.
महाराष्ट्रात एक नवीन सरकार स्थापन झालं आहे. मी मागील तीन महिन्यांपासून बाहेर होतो. या सरकारने काही चांगले निर्णयही घेतले आहेत. मी त्यांचं स्वागतही करतो. फक्त विरोधासाठी विरोध आम्ही कधी करणार नाही. ज्या गोष्टी राज्यासाठी, देशासाठी आणि इथल्या लोकांसाठी चांगल्या असतात त्यांचं नेहमी स्वागतच केलं पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत. विशेषत: गरिबांना घरे देण्याचा निर्णय असेल किंवा म्हाडाचे अधिकार काढून घेण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला होता, जे मला चांगलं वाटत नव्हतं, आता पुन्हा म्हाडाला अधिकार देण्याचा निर्णय फडणवीस साहेबांनी घेतला आहे, हे चांगेल निर्णय आहेत,’ असं म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.