ऍडलेड: टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा मुकाबला इंग्लंडविरुद्ध होत आहे. दुपारी दीड वाजता ऍडलेड ओव्हलवर उपांत्य फेरीचा सामना रंगेल. या सामन्यात भारतानं विजय मिळवल्यास अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजीचा सामना करून मोठं आव्हान उभं करण्याची कामगिरी भारतीय फलंदाजांसमोर आहे.

भारतीय फलंदाजीवर नजर टाकल्यास विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. लोकेश राहुलनंदेखील गेल्या दोन सामन्यात अर्धशतकं झळकावली आहेत. सूर्यकुमार यादवच्या फटकेबाजीची सध्या सर्वाधिक चर्चा आहे. सूर्यानं विश्वचषक स्पर्धेतील ५ सामन्यांत ७५ च्या सरासरीनं २२५ धावा चोपल्या आहेत. त्यानं आतापर्यंत तीन अर्धशतकं झळकावली आहेत.
धोनीमुळे जाणार विराटची विकेट? इंग्लंडनं आखला रनमशीन कोहलीला बाद करण्याचा मास्टरप्लान
फलंदाजी करणारा सूर्यानं आणखी एक कामदेखील अतिशय चोखपणे पार पडत आहे. गोलंदाजांना मैदानाच्या चौफेर फटकावणारा मिस्टर ३६० सूर्यकुमार यादव क्षेत्ररक्षणातही उत्तम कामगिरी करत आहे. पाच सामन्यांत त्यानं ६ झेल टिपले आहेत. उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ४ संघातील कोणत्याच खेळाडूला सूर्याइतके झेल टिपता आलेले नाहीत.

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये श्रीलंकेच्या दसुन शनकानं सर्वाधिक झेल घेतले आहेत. ८ सामन्यांत त्यानं ९ झेल टिपले आहेत. सूर्यानं आणखी ४ झेल टिपल्यास तो यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरेल. या स्पर्धेत सूर्यापेक्षा अधिक धावा कोहलीच्या नावावर आहेत. त्यानं ५ सामन्यांत २४६ धावा केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here