मुंबई: गुरुवारी (१० नोव्हेंबर २०२२) सुरुवातीच्या व्यापारात टाटा मोटर्सचे शेअर्स ३.५ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. अनुभवी ऑटो कंपनीने बुधवारी सप्टेंबर २०२२ तिमाहीचे (Q2FY23) निकाल जाहीर केले, ज्यामध्ये कंपनीचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे समोर आले. टाटा मोटर्सला सप्टेंबर तिमाहीत ९४५ कोटींचा तोटा झाला आहे. मात्र, कंपनीच्या महसुलात ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निकालानंतर, बहुतेक ब्रोकरेज हाऊसेस टाटा मोटर्सच्या स्टॉकमध्ये राहण्याचा किंवा नवीन खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. टाटा मोटर्सचा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला असून गेल्या 2 वर्षांच्या परताव्यावर नजर टाकल्यास या स्टॉकने गुंतवणूकदारांना २०० टक्क्यांहून अधिक परतवा दिला आहे. मात्र, या वर्षी आतापर्यंत हा स्टॉक सुमारे १७ टक्क्यांनी खाली घसरला आहे.

शेअर बाजारातून मालामाल व्हा! ५ दर्जेदार स्टॉक्स वर्षभरात देतील चांगला परतावा
शेअरसाठी रणनीती कशी बनवायची
दरम्यान, ब्रोकरेज हाऊस Edelweiss ने टाटा मोटर्सच्या शेअर्सवर प्रत्येकी रु. ५०२ च्या टार्गेट प्राईससह ‘बाय’ रेटिंग कायम ठेवले आहे. दुसऱ्या तिमाहीत (2QFY23) JLR ची कामगिरी भारताच्या व्यवसायापेक्षा चांगली असल्याचे ब्रोकरेजचे म्हणणे आहे. कंपनीचा एबिटा अपेक्षेपेक्षा चांगला होता. कंपनीने सीव्ही व्यवसायासाठी नजीकच्या काळात दोन अंकी मार्जिनचे लक्ष्य ठेवले आहे. प्रवासी वाहन (PV) मजबूत होत आहे. तसेच एस सिक्युरिटीज प्रति शेअर रु. ५३४ ची टार्गेट प्राईस जशास तशी ठेवत ऑटो स्टॉकवर खरेदीचा सल्ला कायम ठेवला आहे.

राकेश झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओत मोठे बदल; पत्नीने खरेदी केले ६ कंपन्यांचे शेअर्स, तुमच्याकडे आहेत का?
याशिवाय, जेपी मॉर्गन टाटा मोटर्सबद्दल ‘तटस्थ’ मत ठेवले आणि टार्गेट प्राईस ४५५ वरून ४१० रुपये करण्यात आला आहे. ब्रोकरेजने FY२३-२४ साठी एकत्रित EPS मध्ये १२-२५ टक्क्यांनी कपात केली आहे. जेएलआरची दुसऱ्या तिमाहीतील घाऊक विक्री निराशाजनक आहे. किरकोळ विक्री थोडी चांगली आहे. कंपनीचे शून्य निव्वळ कर्जाचे लक्ष्य FY25 च्या पुढे जाऊ शकते. मॉर्गन स्टॅन्लेने टाटा मोटर्सला ५०२ रुपयांचे टार्गेट खरेदी करण्याचा सल्ला दिला तर, जेफरीजने ५४० च्या लक्ष्यासह खरेदी सल्ला कायम ठेवला आहे.

टाटा सोबत नो घाटा! कंपनीचा हा शेअर तुम्हाला करेल मालामाल; अशी करा गुंतवणूक
शेअर्समध्ये पडझड
टाटा मोटर्सचे शेअर्स गुरुवारी ४.६ टक्क्यांनी घसरले. ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ८९८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवल्याच्या एका दिवसानंतर टाटाचा शेअर बाजारात गडगडला. बुधवारी बाजार उघडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.

बीएसईवर टाटा मोटर्सचा शेअर ४.६८ टक्क्यांनी घसरून ४१२.७५ रुपयांवर आला. तर एनएसईवर तो ४.६९ टक्क्यांनी घसरून ४१२.८५ रुपयांवर घसरला. दरम्यान, टाटा मोटर्सने बुधवारी ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत ८९८ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला. भारतातील स्वदेशी वाहन कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात जुलै-सप्टेंबर या कालावधीत ४,४१६ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. मात्र, समीक्षाधीन कालावधीत एकूण उत्पन्न वाढून ८०,६५० कोटी रुपयांवर पोहोचले, जे मागील वर्षीच्या कालावधीत ६२,२४६ कोटी रुपये होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here