जयपूरः राजस्थानमधील सत्तासंघर्षातील घडामोडीत आज भाजपने सत्ताधारी काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष गुलाब चंद कटारिया यांच्यासह डॉ. सतीश पुनिया आणि राजेंद्र राठोड यांनी आपल्या पक्षावरील आरोपांना प्रत्युत्तर देत गहलोत सरकारवर प्रश्नही उपस्थित केले.

एसओजीने दोन जणांना पकडलं आहे. भाजपशी संबंधि हे दोन जण आहेत, असा आरोप होतोय. त्यांची चौकशीही करण्यात आलीय. मग या सर्व प्रकरणात भाजप कुठे सहभागी आहे हे गहलोत सरकारने उघड करावं, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष गुलाब चंद कटारिया यांनी केली आहे.

पकडण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण हा अशोक सिंह नावा आहे. ही व्यक्ती आपल्या मतदारसंघातील बांसवाडा येथील आहे. ४० वर्षापासून आपण त्या जिल्ह्यात जातोय. पण आजपर्यंत अशोक सिंह नावाच्या व्यक्तीला आपण पाहिलेले नाही. कुणी मोठा नेता असेल आणि व्यासपीठावर आपल्यासोबत फोटो काढला असेल तर आपल्याला माहिती नाही. पण सत्ता पाडण्यात सामील असल्याचा आरोप करून भाजपला गोवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं कटारिया म्हणाले.

राजस्थानमधील गहलोत सरकारील संकट हे काँग्रेसच्या आपसातील मतभेदामुळे निर्माण झाले आहे. इतक्या दिवसांपासून पक्षासाठी सोबत काम करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनीच एकमेकांविरोधात तलवारी उपसल्या आहेत. मग इतकी वर्षे सोबत काम करण्याला काय अर्थ आहे. आपल्या स्वार्थाला ठेच पोहोचते तेव्हाच आवाज उठतो का? असा सवाल कटारिया यांनी केला.

राजस्थान पोलीस हरयाणातून रिकाम्या हाताने परतले

राजस्थानमधील सत्तासंघर्षात रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. ऑडिओ टेपपासून ते रोज नवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. ऑडिओ टेपवरून पायलट यांच्या गटातील दोन आमदारांना काँग्रेसने निलंबित केलं आहे. दरम्यान, हरयाणातील मानेसरमध्ये राजस्थान पोलीस किमान अर्धातास थांबले होते. भवरलाल शर्मा यांच्या तपासासाठी ते आले होते. पण हॉटेलमध्ये त्यांना भवरलाल शर्मा आढळून आले नाहीत. यामुळे राजस्थान पोलीस रिकाम्या हाताने परतले. कथित ऑडिओ टेप प्रकरणी राजस्थान पोलीस भवरलाल शर्मा यांची चौकशी करणार होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here