कॅलिफोर्निया: जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. मात्र, कंपनीला हा विक्रम नक्कीच महागात पडला असेल. ॲमेझॉन ही जगातील पहिली कंपनी बनली आहे, जिचे बाजार मूल्य १ ट्रिलियन डॉलरने (१० ट्रिलियन डॉलर) घटले आहे. अर्थव्यवस्थेची खराब स्थिती, कमाईच्या आकडेवारीत सातत्याने घसरण आणि शेअर्सची प्रचंड विक्री ही ॲमेझॉनच्या मूल्यांकनातील या मोठ्या घसरणीचे कारण आहे. अमेझॉन सप्टेंबर २०१८ मध्ये एक ट्रिलियन डॉलर्सच्या बाजारमूल्याची कंपनी बनली.

२१ जून रोजी जेफ बेझोसची कंपनी ॲमेझॉनचे बाजारमूल्य १.८८२ ट्रिलियन डॉलर होते. त्याच वेळी, गुरुवारी त्यांचे बाजार मूल्य ८७८ अब्ज डॉलरपर्यंत घसरले. गेल्या वर्षी ॲपलला मागे टाकत जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनलेल्या मायक्रोसॉफ्टलाही मोठा झटका बसला. मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य ९०० अब्ज डॉलरनी घसरले. तर अमेरिकेतील पहिल्या पाच सर्वात मौल्यवान तंत्रज्ञान (आयटी) कंपन्यांना या वर्षी तब्बल ४ ट्रिलियन डॉलरचे नुकसान झाले आहे, जे तुर्की, अर्जेंटिना आणि स्वित्झर्लंडच्या एकूण जीडीपीपेक्षा जास्त आहे.

बाजाराचा ‘बुल’ घोड्या पेक्षा वेगाने धावणार! शेअर बाजाराबाबत महत्वाचं भाकीत!
कमकुवत तिमाही निकाल
gizmodo.com च्या अहवालानुसार, ॲमेझॉनने गेल्या महिन्यातच तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले, त्यानंतर गुंतवणूकदारांची निराशा झाली. विशेष म्हणजे, कंपनीने चौथ्या तिमाहीत केवळ २.८% वार्षिक वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे, जो त्यांच्यासाठी खूपच कमी आहे. सतत नवनवीन उंची गाठणाऱ्या ॲमेझॉनला ई-कॉमर्स खरेदीत घट झाल्याने मोठा तोटा सहन करावा लागला आहे.

एलन मस्कचे मोठे नुकसान! टेस्लाचे कोट्यवधीचे शेअर्स विकण्याची वेळ; Twitter डील महागात पडली
शेअर्स ५०% घसरले
ॲमेझॉन, जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रिटेलर, यावर्षी ई-कॉमर्स क्षेत्रात मोठ्या मंदीचा सामना करत आहे. तर कंपनीला करोना साथीच्या आधीच्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी थोडा वेळ लागू शकतो. मंद विक्री, वाढता खर्च आणि व्याजदरात झालेली वाढ यामुळे त्याचे शेअर्स जवळपास ५० टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच ब्लूमबर्ग आकडेवारीनुसार ॲमेझॉनचे सह-संस्थापक जेफ बेझोस यांनी सुरुवातीच्या दिवसांपासून कंपनी ८३ अब्ज डॉलरवरून १०९ अब्ज डॉलरपर्यंत वाढल्याचे पाहिले आहे.

अमेरिकेत मंदी भारतासाठी संधी; IT कंपन्यांतील नोकरकपात भारतासाठी कशी फायद्याची
नवीन भरतीवर बंदी
दरम्यान, तिसऱ्या तिमाहीचे आकडे जाहीर करताना ॲमेझॉनचे सीईओ अँडी जेसी म्हणाले की, आर्थिक वातावरणात खूप बदल होत आहेत. अँडीने सांगितले की ते त्याच्या प्रमुख दीर्घकालीन उद्दिष्टांशी समतोल साधून गुंतवणूक धोरण तयार करेल. मात्र, चांगली गोष्ट म्हणजे ॲमेझॉनने अद्याप कर्मचाऱ्यांना कामावरून काढलेले नाही मात्र, कंपनीने नव्या भरतीला स्थगिती दिली आहे. लक्षात घ्या की मेटासह अनेक दिग्ज टेक कंपन्यांनी उत्पन्नातील घट लक्षात घेऊन कर्मचारी कपात केली आहे.

मेटाचा ११ हजार कर्मचाऱ्यांना नारळ
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकची मूळ कंपनी, मेटा प्लॅटफॉर्म्स इंक. ने बुधवारी ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले तर, कंपनीने आधीच नवीन भरती थांबवली आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्गने टाळेबंदीबद्दल माफी मागितली आणित्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here