वैयक्तिक, गृहकर्ज होणार महाग
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षाचा एमसीएलआर दर जो पूर्वी ७.८० टक्के होता, तो आता ७.९० टक्के झाला आहे. हे नवे दर ७ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. या दरात वाढ झाल्याने वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि वाहन कर्ज यासारख्या कर्जाचे हप्ते वाढतील. बँकेने नियामक फाइलिंगवर ही माहिती दिली आहे.
मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ
कर्जाच्या दराव्यतिरिक्त, बँकेने त्यांच्या मुदत ठेवींचे (FD) दर देखील बदलले आहेत. एफडीवरील व्याजदर ९ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. बँक ७ दिवसांपासून ते ५ वर्षांपेक्षा जास्त मुदतीच्या ठेवींवर २.७५ टक्के ते ५.७५ टक्के व्याजदर देत आहे. याशिवाय ४०० दिवसांच्या मुदत ठेवीवर ६.३० टक्के व्याजदर असेल.
एचडीएफसीची कर्जावरील व्याजदरात वाढ
खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी (HDFC) बँकेने कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे कर्ज महाग झाले असून ज्या ग्राहकांनी आधीच कर्ज घेतले आहे त्यांना अधिक ईएमआय भरावा लागणार आहे. बँकेने मार्जिनल कॉस्ट लेंडिंग रेट (MCLR) दरांमध्येही वाढ केली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदर पूर्वीपेक्षा जास्त झाला आहे.
बँक ऑफ बडोदाकडूनही दरवाढ
बँक ऑफ बडोदाने एक वर्षाच्या कालावधीसाठी MCLR ७.९५ टक्के केला आहे. तर तीन महिने आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR अनुक्रमे ७.६५ टक्के आणि ७.८० टक्के करण्यात आला आहे.