दरवर्षी आषाढी व कार्तिकी यात्रेच्या गोपाळकालानंतर दुसऱ्या दिवशी हा करण्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. याहीवर्षी परंपरेनुसार सहा जुलै रोजी महाद्वार काला झाल्यानंतर काढलेल्या मिरवणुकीमुळे जमावबंदी आदेशाचे तसेच साथ रोग प्रतिबंधक अधिनियमाचे उल्लंघन केल्याच्या कारणावरून आता तब्बल १० दिवसानंतर संत नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज तसेच मदन महाराज हरिदास यांच्यासह इतरांवर पंढरपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आज एकूण २० जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महाद्वार काल्याचे जनक कन्हैया हरिदास यांचे विद्यमान वंशज मदन महाराज हरिदास यांच्या मस्तकावर त्यांच्या देवघरातील श्री विठ्ठलाच्या पादुका ठेवून परंपरेप्रमाणे महाद्वार काल्याचा सोहळा होत असतो. ती प्रथा यंदाही कायम ठेवण्यात आली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times