मुंबई: मुंबईत फोर्ट भागात काल संध्याकाळी सहा मजली कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ४ लाख व जखमींना ५० हजारांची मदत सरकारकडून जाहीर झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ही माहिती दिली आहे. तसंच, इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत रहिवाशांची राहण्याची व्यवस्था सरकारकडून करण्यात येणार असल्याची ग्वाही गृहनिर्माणमंत्री यांनी दिली.

फोर्ट भागात जीपीओ इमारतीसमोर भानुशाली इमारत आहे. ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतरही काही कुटुंबं इमारतीत राहत होती. या कुटुंबांना भीषण दुर्घटनेचा सामना करावा लागला. गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास इमारतीचा मोठा भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि त्याखाली अनेक जण दबले गेले. या दुर्घटनेत नऊ जाणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. अग्निशामक दल व महानगरपालिकेच्यावतीने अद्यापही मदतकार्य सुरू आहे. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुर्घटनाग्रस्तांना संपूर्ण मदत करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या होत्या.

वाचाः

दुर्घटनाग्रस्तांना चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत. तसेच त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना शेख यांनी प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मृतांच्या कुटुंबियांना अतिरिक्त मदत मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा प्रशासनास सूचना देण्यात आल्या आहेत.

मृतांची नावे खालीलप्रमाणे:

कुसुम गुप्ता (वय ४५)
ज्योत्स्ना गुप्ता (वय ५०)
पदमलाल गुप्ता (वय ५०)
महिला (ओळख पटलेली नाही)
किरण मिश्रा (वय ३५)
मनीबेन फरिया (वय ६२)
शैलेश कांडू (वय १७)
प्रदीप चौरसिया (वय ३५)
रिकू चौरसिया (वय २५)

दरम्यान, येथे नुरी मशीद जवळील तळमजला अधिक दुमजली घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन ठार तर १३ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांनाही सरकारकडून प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर झाली आहे. अशी माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री
यांनी दिली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here