भारतीय विशेष ओळख प्राधिकरण प्रत्येक नागरिकाला देत असलेला आधार क्रमांक कायम ठेवण्यासाठी त्याच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे गरजेचे आहे. यासाठी नेमका कालावधी किती असावा हे आता केंद्र सरकारने स्पष्ट …

 

aadhar card
आधार कार्ड अपडेट केले का? पाहा केंद्र सरकारने केली नियमांमध्ये सुधारणा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतीय विशेष ओळख प्राधिकरण प्रत्येक नागरिकाला देत असलेला आधार क्रमांक कायम ठेवण्यासाठी त्याच्याशी संबंधित वैयक्तिक माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे गरजेचे आहे. यासाठी नेमका कालावधी किती असावा हे आता केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यानुसार, सरकारने आधार नियमांमध्ये सुधारणा करत आधार धारकाने आधारसाठी नोंदणी केल्यापासून किमान १० वर्षांतून एकदा तरी आधार अद्ययावत करावे, असे म्हटले आहे. आधार क्रमांक मिळवण्यासाठी दिलेली माहिती अशा प्रकारे अद्ययावत केल्यामुळे आधार तपशिलाची सेंट्रल आयडेन्टिटीज डेटा रिपॉझिटरीमधील अचूकता कायम राखली जाईल, असे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व आयटी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे. आधार क्रमांक धारकाने त्याचे ओळखपत्र, वास्तव्याचा तपशील अशी कागदपत्रे १० वर्षांनी एकदा अद्ययावत करणे अपेक्षित आहे. अशी कागदपत्रे अद्ययावत करताना ती दिलेल्या प्रक्रियेनुसारच अद्ययावत केली जावीत, असेही या अधिसूचनेत म्हटले आहे. गेल्या महिन्यात विशेष ओळख क्रमांक प्राधिकरणाने नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक माहितीत काही बदल झाला असल्यास ती प्राधिकरणाकडे अद्ययावत करावी, असे आवाहन केले होते. ही माहिती ऑनलाइन अद्ययावत करणे शक्य आहे. त्यासाठी मायआधार या पोर्टलचा वापर करणे अनिवार्य आहे. याखेरीज मायआधार अॅप वापरूनही माहिती अद्ययावत करता येईल किंवा हे दोन्ही पर्याय वापरणे शक्य नसल्यास जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जाऊन, तिथे कागदपत्रे दाखवून माहिती अद्ययावत करता येणार आहे. या नव्या सुविधेअंतर्गत आधार धारकांना त्यांचे तपशील अद्ययावत करून रिव्हॅलिडेशन करून घेता येणार आहे. याचा फायदा आत्तापर्यंत दिल्या गेलेल्या १३४ कोटी आधार क्रमांकांना होणार आहे. गेल्या वर्षी १६ कोटी नागरिकांनी आपली आधारसाठी दिलेली माहिती अद्ययावत केली होती.

सर्वोच्च न्यायालयात पुन्हा मराठी ठसा; न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड देशाचे ५०वे सरन्यायाधीश

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here