पिंपरी: कडक जाहीर करूनही बाधितांची संख्या झपाट्याने वाढतच असल्यामुळे यापुढील काळात रुग्णांची काळजी घेण्याची लढाई लढावी लागणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात ठिकठिकाणी उभारण्यावर भर दिला आहे. ( Coronavirus In )

वाचा:

शहरात करोना बाधितांची संख्या दहा ते बारा दिवसांत दुप्पट होत आहे. गेल्या दोन दिवसांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. रोज सरासरी पाचशेहून अधिक रुग्ण आढळत आहेत. लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णसंख्येचा आलेख वाढतच जाणार आहे, ही शक्यता गृहीत धरून रुग्णांवर वेगाने उपचार व्हावेत, त्यांची योग्य काळजी घेता यावी, यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांच्या सूचना विचारात घेऊन कार्यवाही करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

जुलैअखेरपर्यंत २० ते २२ हजार रुग्ण होण्याचा अंदाज घेऊन कोविड केअर सेंटर (सीसीसी) वाढविण्यात येणार आहेत. नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडिममध्ये केंद्र तयार करण्यात येणार असून त्याची क्षमता दोन हजार बेडची असणार आहे. यासाठी एमईपी सिस्टिम सोल्युशन्स यांची सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.

वाचा:

लक्षणे विरहित परंतु घरी विलगीकरण (आयसोलेट) होणे शक्य नसलेल्या रुग्णांवर ‘सीसीसी’ सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. येत्या काही दिवसांत दहा हजार रुग्णांची सोय होईल, असे सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. विद्युतीकरण करणे, जनरेटर बसविणे, अग्निप्रतिबंधक यंत्रणा, पाण्याचे पंप, वॉटर हिटर, वॉटर प्युरिफायर, अंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे या कामांना गती देण्यात येणार आहे.

कोविड केअर सेंटरसाठीच्या जागा

– कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम
– पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग
– विभागीय टेलिकॉम सेंटर
– सिम्बॉयोसिस कॉलेज
– डॉ. डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह
– डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेदीक कॉलेज
– आदिवासी विभाग मुलांचे व मुलींचे वसतिगृह
– बालाजी युनिव्हर्सिटी लॉ कॉलेज
– इंदिरा कॉलेज
– बालेवाडी वसतिगृह
– सामाजिक न्याय विभागाचे मुलांचे व मुलींचे वसतिगृह
– चाकण-म्हाळुंगे म्हाडा वसाहत

वाचा:

लोकप्रतिनिधींच्या सूचना

महापौर माई ढोरे – खासगी रुग्णालयांनी केअर सेंटर्स सुरू करा
नामदेव ढाके – उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलांवर कारवाई करा
नाना काटे – उपलब्ध बेडबाबत कृतीशील आराखडा करा
मंगला कदम – शहरातील हॉस्टेल्स, हॉटेल ताब्यात घ्या
संदीप वाघेरे – प्लाझ्मा दानशूरांना प्रोत्साहन रक्कम द्या
गजानन बाबर – जनआरोग्य योजनेचा लाभ सर्वांना द्या
योगेश बाबर – कोविडच्या आरक्षित बेडची पूर्ण माहिती द्या
मारुती भापकर – भ्रष्टाचाराचा विषाणू हद्दपार करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पिंपरी-चिंचवडमधील परिस्थितीचा शुक्रवारी आढावा घेतला. पालिकेच्या वॉर रुमला भेट देऊन माहिती घेतली. शहरात करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहेत. दररोज रुग्णवाढीचा उच्चांक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत पालिका प्रशासनाला सूचना केल्या. संकट निराकरणासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here