सेक्टरची स्थिती
शेअर बाजारातील जोरदार तेजीमुळे बँक निफ्टीने प्रथमच ४२,००० चा टप्पा पार केला आहे. बाजारातील आजच्या तेजीमध्ये सर्वच क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषत: आयटी, एफएमसीजी, एनर्जी, ऑटो क्षेत्रातील शेअर्समध्ये कमालीची तेजी आहे. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही तेजीने व्यवहार करत आहेत. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी फक्त एक शेअर लाल चिन्हात तर ४९ शेअर्स हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. तसेच सेन्सेक्सच्या ३० समभागांपैकी २९ समभाग वाढीसह व्यवहार करत असून एक समभाग घसरत आहे.
गुरुवारी अमेरिकेतील चलनवाढीच्या आकडेवारीत नरमाई आल्याने डाऊ जोन्स, नॅस्डॅकसह जवळपास सर्वच निर्देशांकांमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळाली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज १२०१ अंकांच्या किंवा ३.७० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय, S&P 500 ने ५.५४% ची उसळी घेतली आणि २०७ अंकांनी वाढून ३९५६ च्या पातळीवर बंद झाला. तर, नॅसडॅक ७.३५% ने ११११४ स्तरावर बंद झाला.
कोणते शेअर्स वधारले
इन्फोसिस ४.०५ टक्के, टेक महिंद्रा ३.८६ टक्के, विप्रो ३.७५ टक्के, एचसीएल टेक ३.५९ टक्के, टीसीएस ३.५२ टक्के टाटा स्टील २.५३ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे.
बाजारातील तेजीचे कारण
ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेतील महागाई दराच्या आकडेवारीत घट झाली आहे. महागाईचा दर सप्टेंबरमध्ये ८.२ टक्क्यांवरून ७.७ टक्के राहिला. चलनवाढीचा दर घसरल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात प्रचंड वाढ झाली. नॅसडॅक ७.३५ टक्के म्हणजेच ७६० अंकांनी वाढू ११,११४ अंकांवर बंद झाला तर डाऊ जोन्स १२०० अंकांनी वधारला. फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीला ब्रेक लावू शकते, यामुळे बाजाराने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.