नवी दिल्ली:मसन युनिट्रेड या कंपनीशी संलग्न असलेल्या समीर गुलाबराव थिटे याने अनेक गुंतवणूकदारांना निश्चित परताव्याची हमी देणाऱ्या योजना देऊ केल्या आहेत. मात्र ही कंपनी तसेच हा प्रतिनिधी, दोघेही राष्ट्रीय शेअर बाजाराचे (एनएसई) नोंदणीकृत प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे याच्याकडून दिल्या जाणाऱ्या निश्चित परताव्याची हमी देणाऱ्या योजनांवर विश्वास ठेवू नये, असा इशारा एनएसईने गुरुवारी दिला.

EPF पेन्शन फंडाच्या मर्यादेत बदल; जाणून घ्या कोणाला, कसा होणार फायदा
समीर गुलाबराव थिटे आणि तो संलग्न असलेली सॅमसन युनिट्रेड गुंतवणूकदारांचे ट्रेडिंग खाते वापरण्यासाठी काही ऑफर्स देत होते. यासाठी या दोघांकडून गुंतवणूकदारांना युझर आयडी आणि पासवर्ड देण्याचा आग्रह केला जात होता. परंतु या दोघांपासून गुंतवणूकदारांनी सावध राहावे व या दोघांकडून दिल्या गेलेल्या कोणत्याही योजनांमध्ये गुंतवणूक करू नये, असे एनएसईने खबरदारीसाठी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारांनी या दोघांना तसेच कुणालाही आपले युझर आयडी आणि पासवर्ड देऊ नयेत असेही एनएसईने सांगितले आहे.

Business Idea: ATM द्वारेही होऊ शकते मोठी कमाई, फक्त करावे लागणार हे काम
यापूर्वी एनएसईने सूरज मौर्य, एमर्स ट्रेडर, शेअर्स बाजार, रिअल ट्रेडर व ग्रो स्टॉक यांच्याबाबतही सावधतेचा इशारा दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here