पुणे : घरात पाळीव प्राणी पाळण्याचा अनेकांना छंद असतो. पण यासाठी आता पालिकेचा परवाना असणं महत्त्वाचं आहे. पुण्यामध्ये श्वान घरी पाळण्यासाठी पालिकेचा परवाना घ्यावा लागतो, याप्रमाणे आता मांजर पाळण्यासाठीही पालिकेची परवानगी असणं महत्त्वाचं आहे. यासंबंधी महत्त्वाचा आदेश पुणे महापालिकेकडून देण्यात आला आहे.
मांजर पाळण्याची आवड असणाऱ्या पुणेकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, आता तुम्हाला घरी मांजर पाळायची असेल तर यासंबंधी पालिकेत अर्ज भरणं अनिवार्य आहे. खरंतर, आधी फक्त श्वान पाळण्यासाठी नियम होते. मात्र, मांजर पाळण्यासाठी कुठलेही नियम नव्हते. पण आता पुण्यात मांजर पाळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठा घाट फक्त २ मिनिटांत होणार पार, ‘या’ तारखेपर्यंत होईल काम पूर्ण मांजर पाळण्यासाठी आता तुम्हाला अर्ज भरून मांजराचे तीन फोटो आणि ५० रूपये शुल्क अर्जासोबत महापालिकेला द्यावा लागणार आहे. इतकंच नाहीतर अँटीरेबीज लसीकरण प्रमाणपत्रही सादर करावं लागणार आहे. याबाबतचे आदेशच पुणे महापालिकेकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी याची नोंद घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार शहरामध्ये १ लाखापर्यंत पाळीव कुत्रे आहेत. मात्र, आत्तापर्यंत फक्त ५ हजार ५०० कुत्र्यांची नोंदणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.