कोल्हापूर : जिल्ह्यातील एका तरुणाने गेल्या महिन्यात वाजत गाजत मिरवणूक काढून आणलेली २१ लाख रुपयांची दुचाकी जळून खाक झाली आहे. या दुचाकीच्या शेजारी असलेल्या एका कारचंही आगीत प्रचंड नुकसान झालं आहे. आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली.
पहाटे साडेतीन वाजता दुचाकीला आग लागल्याचं चौगुल कुटुंबाच्या लक्षात आलं. त्यानंतर सर्वांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत त्या गाडी शेजारी असलेली त्यांची चारचाकी कारही पूर्णपणे जळाली होती.
दरम्यान, या वाहनांना आग कशी लागली? की जाणून बुजून ही आग लावली? याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात याबाबत चौगुले यांनी फिर्याद दिली असून पोलीस त्याचा तपास करत आहेत.