नवी दिल्लीः राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि यांच्यातील सत्तासंघर्षात रोज राजकीय समीकरणं बदलत आहेत. अशा स्थितीत काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट () हे आता नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सचिन पायलट हे आपला नवीन पक्ष काढणार आहेत, अशी चर्चा सुरुवातीपासून करण्यात येत आहे. अशातच काँग्रेसने त्यांच्याबाबतीत काहीशी नरमाईची भूमिका घेतलीय. पण राजस्थानमधील या राजकीय रणसंग्रमात () सचिन पायलट यांनी कोर्टात धाव घेतल्याने त्यांचे काँग्रेसमध्ये () परतण्याची शक्यता कमी झाली आहे. तर सचिन पायलट हे नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे.

नवा पक्ष बनवण्यासाठी सचिन पायलट हे सर्व बाजूंनी चाचपणी करत आहेत. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या आणि आता काँग्रेसमध्ये बेदखल असलेल्या आपल्या सहकाऱ्यांना सचिन पायलट यांनी संपर्क केल्याचं बोललं जातंय. तर दुसरीकडे काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बर यांनी सचिन पायलट यांच्याशी चर्चा केलीय आणि त्यांना काँग्रेसमध्ये परतून चर्चेद्वारे आपले मुद्दे सोडवण्याचा सल्ला दिलाय, असंही बोललं जातंय.

राहुल गांधींची यंग टीम घेऊनच सचिन पायलट पक्ष बनवणार?

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्यापासून ते माजी खासदार प्रिया दत्त, माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि जितीन प्रसाद या काँग्रेसशी संबंधित नेत्यांशी सचिन पायलट यांनी संपर्क केल्याचं बोललं जातंय. हरयाणातील माजी आमदार आणि माजी मंत्री कुलदीप बिश्णोई यांनाही संपर्क केल्याचं सांगण्यात येतंय. तसंच हरयाणाचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते ज्यांची अलिकडेच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली ते संजय झा यांनाही सचिन पायलट यांनी संपर्क केल्याची चर्चा आहे. अशोक तंवर यांची हरयाणा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून हकालपट्टी केली गेली होती. जी काही नावं चर्चेत आहेत विशेष म्हणजे ते सर्व नेते कधीकाळी राहुल गांधींच्या टीमचा एक भाग होते किंवा त्यांच्या गुडबुकमध्ये तरी होते.

सचिन पायलट विश्वासार्ह नेते

सचिन पायलट हे नवीन पक्ष स्थापन करण्यात सक्षम आहे, असं काँग्रेसमधीलच एका नेत्याने सांगितलं. सध्या जी काही नावं चर्चेत आहेत ते सर्व तरुण आहेत. त्यांना करिअर घडवायचं आहे आणि त्यांच्याकडे वयही आहे. राजकारण आल्यावर सर्वांनाच काम करायचं असतं. जे सध्या काँग्रेसमध्ये कुठे होताना दिसत नाहीए. यामुळे एका विश्वासार्ह आणि तरुण नेत्याची आवश्यता आहे. हे सर्व गुण सचिन पायलट यांच्यात आहेत. दुसरं म्हणजे सचिन पायलट यांनी जनतेतही आपला विश्वास निर्माण केला आहे. जनतेशी त्यांचा संपर्क आहे. जनतेचा पाठिंबा मिळवण्यातही ते माहीर आहे. या सर्व गोष्टी त्यांच्या सोबत येणाऱ्या नेत्यांसाठी महत्त्वाच्या ठरू शकतात, असं त्या नेत्याने नाव उघडन न करण्याच्या अटीवर सांगितलं.

एनबीटीकडून संजय निरुपम यांना या मुद्द्यावर संपर्क केला गेला. सचिन पायलट यांच्याशी कित्येक महिने झाले संपर्क झालेला नाही. राहुल गांधींनी पक्षाध्यक्ष होण्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत, असं संजय निरुपम म्हणाले.

राष्ट्रीय पातळीवर नवा पक्ष बनवणं अवघड

काँग्रेसमधून बाहेर पडून अनेकांनी प्रयत्न केलेत. पण काही प्रकरणं सोडली तर बहुतेकांना त्यात यश आलेलं नाही. ज्यांना यश आलं आहे ते प्रादेशिक पक्ष म्हणून काम करत आहेत. या प्रयत्नांनी राज्य स्तरावर काम करता येऊ शकतं. पण राष्ट्रीय स्तरावर नव्या राजकीय पक्षाची गोष्ट शक्य नाही, असं संजय निरुपम म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here