मुंबई- सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता चे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले. शुक्रवारी सकाळी तो जिममध्ये वर्कआउट करत असताना त्याचं निधन झाल्याचं बोललं जात आहे. सिद्धांतला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सिद्धांतला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी राहिले. राजू श्रीवास्तव आणि दीपेश भान यांच्यानंतर जिममध्ये वर्कआउट करताना अभिनेत्याचा झालेला हा तिसरा मृत्यू आहे.

‘कुसुम’, ‘वारीस’ आणि ‘सूर्यपुत्र करण’ या मालिकांसाठी अभिनेता खूप प्रसिद्ध आहे. टीव्ही अभिनेता जय भानुशालीने चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली. सिद्धांत वीर यांच्या पश्चात पत्नी एलिशिया राऊत आणि दोन मुले आहेत. फिटनेसबाबत सिद्धांत खूप दक्ष होता.

जय भानुशालीने दिला दुजोरा

सिद्धांत वीरचा फोटो शेअर करत जय भानुशालीने लिहिले, ‘भाऊ, तू खूप लवकर निघून गेलास.’ जयने प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सिद्धांतच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने सांगितले की, मला ही बातमी एका कॉमन फ्रेंडकडून मिळाली. जिममध्ये व्यायाम करत असताना त्याचा मृत्यू झाला.

कोण होता सिद्धांत वीर सूर्यवंशी?
सिद्धांत वीर सूर्यवंशी याने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. त्याला आनंद सूर्यवंशी या नावानेही ओळखलं जायचं. ‘कुसुम’ या मालिकेतून त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केलं. याशिवाय सिद्धांतने अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये काम करत घराघरात आपला ठसा उमटवला. ‘कसौटी जिंदगी की’, ‘कृष्ण अर्जुन’, ‘क्या दिल में है’पासून अनेक मालिकांमध्ये काम केलं. ‘क्यों रिश्तों में कट्टी बत्ती’ आणि ‘जिद्दी दिल’ हे त्याचे शेवटचे प्रोजेक्ट होते.

वादग्रस्त राहिलं वैयक्तिक जीवन

सिद्धांत वीर सूर्यवंशी याचं वैयक्तिक आयुष्य खूप वादग्रस्त राहिलं आहे. यापूर्वी त्याने इरा नावाच्या मुलीशी लग्न केलं होतं, परंतु २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. दोन वर्षांनी सिद्धांत पुन्हा प्रेमात पडला. अ‍ॅलिसियावर त्याचं मन जडलं. पहिल्या लग्नापासून त्याला एक मुलगी होती. दुसऱ्या लग्नानंतर त्याला मुलगा झाला. सिद्धांत आणि अ‍ॅलिसिया हे दोघे मिळून दोन मुलांचा सांभाळ करायचे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here