नवी दिल्ली: एकाचा तोटा हा दुसऱ्याचा फायदा असतो असं म्हणतात. सध्या भारताला याचाच प्रत्यय येत आहे. रशियासोबतचा व्यापार अमेरिकेनं रोखला आहे. युक्रेनविरोधात युद्ध जाहीर केल्यापासून अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदी केलेली नाही. त्यामुळे आता तेल पुरवठ्यासाठी अमेरिकेनं भारताकडे मोर्चा वळवला आहे.

ग्लोबल ऑईल ट्रेडर्स Vitol आणि Trafigura नं भारतीय रिफायनिरी नायरा एनर्जीकडून १० ते १५ डॉलर प्रति बॅरलच्या दरानं एक-एक कार्गो व्हॅक्यूम गॅस ऑईलची (VGO) खरेदी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तेल भारताच्या वादिनार बंदरातून डिसेंबरमध्ये अमेरिकेला जाईल. व्हीजीओ हा खनिज तेलाचा एक प्रकार आहे. त्यापासून गॅसोलिन आणि डिझेल तयार केलं जातं.
थरारक! खिडकीला उलटा लटकला वृद्ध; १५० फूट उंचीवरून कोसळणार, तितक्यात…
याआधी Aframax tanker Shanghai Dawn नं रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर तेलशुद्धीकरण कारखान्यातून ८० हजार टन व्हीजीओ खरेदी केलं होतं. हा साठा ऑक्टबरच्या शेवटी अमेरिकेला पोहोचलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भारतानं अमेरिकेला पुरवठा केलेल्या व्हीजीओचं प्रमाण खूप जास्त आहे. मे २०२१ मध्ये अमेरिकेनं भारताकडून केवळ एकच कार्गो व्हीजीओ खरेदी केलं होतं. यंदाच्या वर्षात हे प्रमाण कैकपटीनं वाढलं आहे.
चीन, पाकिस्तान जगावर आणणार मोठं संकट; रावळपिंडीतील सीक्रेट लॅबमध्ये चाललंय काय?
युक्रेन युद्धाआधी अमेरिका सर्वाधिक व्हीजीओ रशियाकडून आयात करायची. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिकेनं रशियावर निर्बंध लादले. अमेरिका आणि कॅनडानं रशियाकडून होणारी तेल खरेदी पूर्णपणे रोखली. भारत खनिज तेल खरेदी करणारा जगातील तिसरा मोठा देश आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले. मात्र भारतानं रशियानं तेल खरेदी सुरुच ठेवली. रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करून भारत त्याच्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करतो आणि चढ्या दरानं पाश्चिमात्य देशांना विकतो. यातून भारतानं कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here