एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा (सिंहगड संस्था) येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होतं. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी ८ किमी असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर आहे. देशातीलच नव्हे, तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. अपघातसंख्येत मोठी घट होईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.

मिसिंग लिंक

‘या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूककोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदूषण कमी होणार आहे. दरडी कोसळू नयेत, यासाठी सर्वत्र ‘रॉक बोल्ट’ करण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर एग्झिट मार्ग तयार करण्यात आले आहेत,’ अशीही माहिती त्यांनी दिली. ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत लोणावळा (सिंहगड संस्था) ते खालापूर पथकर नाक्यापर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमतावाढ करण्याचं काम सुरू आहे.

असा आहे प्रकल्प

खालापूर टोलनाका ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाच्या आठ पदरीकरणाचे ५.८६ किमीचे काम बहुतांश पूर्ण झाले आहे. या लांबीमध्ये तीन मोठे पूल, लहान पूल, पाइपकल्व्हर्ट, बॉक्सकल्व्हर्ट अंतर्भूत आहे. सद्यस्थितीत ९० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. बोगदा क्र. १च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याच्या एकूण १ हजार ५६० मीटरपैकी १ हजार ४५१ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले.

बोगद्याचं खोदकाम

डाव्या बोगद्याच्या एकूण १ हजार ५३० मीटरपैकी १ हजार ४५५ मीटर खोदकाम पूर्ण झाले आहे. बोगदा क्र. २च्या दोन समांतर बोगद्यांपैकी उजव्या बोगद्याच्या एकूण ८ हजार ७७६ मीटरपैकी ७ हजार ६९६ मीटर (मुंबईकडे) खोदकाम पूर्ण झाले. डाव्या बोगद्याच्या ८ हजार ८२२ मीटरपैकी ७ हजार ५२९ मीटर (पुणेकडे) खोदकाम पूर्ण झाले आहे. बोगद्यांची रुंदी २३ मीटर आहे.

मुंबई ते पुण्याचं अंतर कमी होणार

या पुलामुळे मुंबई ते पुण्याचं अंतर अर्धा तासाने कमी होणार आहे. त्याशिवाय ट्रॅफिक आणि प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. दरड कोसळू नये यासाठी ठिकठिकाणी रॉक बोल्ट लावण्यात आले आहेत. त्याशिवाय ३०० मीटरच्या अंतरावर इमर्जन्सीमध्ये बाहेर पडण्याचा मार्ग आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत हा पूल वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याची माहिती आहे. लेटेस्ट टेक्नोलॉजीचा वापर करुन हे बांधकाम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here