वसई: वसईत राहणाऱ्या एका मुलीच्या पोटातून डॉक्टरांनी १.२ किलोचा केसांचा गोळा बाहेर काढला आहे. जवळपास तासभर शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी केसांचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला. मुलीला पोटदुखीची समस्या जाणवू लागली. तिला काही खाता, पिता येत नव्हतं. त्यामुळे पालकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं.

तेरा वर्षांच्या मुलीला पोटदुखीचा त्रास सुरू होता. तिला उलट्या सुरू होत्या. अपचनाची समस्या भेडसावत होती. पालकांनी तिला सुरुवातीला एका दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तिला काही औषधं दिली. मात्र तिची प्रकृती सुधारत नव्हती. यानंतर पालकांनी मुलीला वसई पश्चिम येथील डिसुझा रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्याच्या सूचना दिल्या. मुलीच्या पोटात मानवी केसांचा मोठा गोळा असल्याचं सोनोग्राफीतून स्पष्ट झालं.
अग्निवीर होण्याचं स्वप्न अधुरं! भरतीत दोन सख्खे भाऊ धावले; एकाच लक्षणानं दोघांचा मृत्यू
सोनोग्राफीचा अहवाल पाहिल्यानंतर डॉ. जोसेफ डिझुझा यांनी मुलीच्या पालकांशी संवाद साधला. मुलीला स्वत:चे केस आणि नखं गिळण्याची सवय असल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. गेल्या सात ते आठ वर्षांपासून मुलगी केस, नखं गिळत असल्याचं पालकांनी डॉक्टरांना सांगितलं. या प्रकाराल रॅप्युन्झेल सिंड्रोम असं म्हणतात.
एकटेच बिर्याणी खाताय? बायको संतापली, नवऱ्यानं पेटवून दिलं; तिनं मिठी मारली अन् सारंच संपलं
जवळपास तासभर शस्त्रक्रिया करुन डॉक्टरांनी ३२ इंच लांबीचा केसांचा गोळा पोटातून बाहेर काढला. या गोळ्याचं वजन १.२ किलो भरलं. शरीरात जाणारे अन्न पदार्थ या गोळ्यात अडकले होते, अशी माहिती जोसेफ डिसुझा यांनी दिली. संबंधित मुलगी सध्या रुग्णालयातच देखरेखीखाली असल्याचं त्यांनी सांगितलं. पोटात केसांचा मोठा गोळा असल्यानं मुलीला काहीच खाता येत नव्हतं. खाल्लेलं सगळंच ती बाहेर काढत होती, असं डिसुझा म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here