Bharat Jodo Yatra : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्यासोबत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले. यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी आदित्य ठाकरेंची गळाभेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्यासह  इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले होते. काँग्रेसचे अनेक नेते देखील राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत सहभागी झाले आहेत. 

आदित्य ठाकरे यांनी हिंगोली येथे आज राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा केली. गुरुवारी यात्रेच्या 64 व्या दिवशी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे याही राहुल गांधींसोबत नांदेडमध्ये यात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हेही सहभागी झाले होते. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार होते. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते सहभागी झाले नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी गुरुवारी सांगितले की, शरद पवार यांना नुकतेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने ते यात्रेला उपस्थित राहणार नाहीत.
 
दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेतून भाजवर निशाणा साधलाय. संविधान आणि लोकशाहीसाठी आम्ही लढत आहोत असे सांगत आदित्य ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेतून भाजवर हल्लाबोल केलाय. 

Reels

महाराष्ट्रामध्ये आलेले सरकार घटनाबाह्य आहे. अशाच वागणुकीमुळे आपल्या घटनेला  आणि लोकशाहीला या देशात धोका आहे. मी आज भारत जोडो यात्रेत सहभागी होत असलो तरी आणि आम्ही दोन्ही पक्ष वेगवेगळ्या विचारांचे असलो तरी लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.  कधीकाळी इंदिराजी आणि बाळासाहेब प्रणव मुखर्जींसाठी एकत्र आले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

काँग्रेसची भारत जोडी यात्रा तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झाली. तामिळनाडूनंतर ही पदयात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामार्गे महाराष्ट्रात पोहोचली आहे. ही यात्रा राज्यातील 15 विधानसभा आणि सहा लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे. यादरम्यान 382 किमी अंतरचा प्रवास होईल. ही यात्रा 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल होणार आहे 

महत्वाच्या बातम्या

‘हम गांधी है’ म्हणत राहुल गांधींकडून दुसऱ्या मुलालाही लॅपटॉप; एकाला व्हायचंय इंजिनिअर तर दुसऱ्याला डॉक्टर  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here