– डॉ. सुशांत शिंदे, कन्सल्टण्ट फिजिशिअन

करोना संसर्गासोबत दोन हात करताना लॉकडाउनच्या काळामध्ये स्पाँडिलायसिसचा त्रास कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. योग्यवेळी डॉक्टरांची मदतही घ्यायला हवी.

लक्षणे कोणती-
-सकाळी लवकर पाठीच्या खालील भागात वेदना जाणवणे व ही अवस्था ४५ मिनिटांहून अधिक काळ टिकणे.

-औषधे घेऊनही ९० दिवसांहून अधिक काळ पाठदुखी व पाठीचा ताठरपणा कायम राहणे.

– पाठ, सांधे, नितंब व मांड्यांतील वेदनांमध्ये अचानक खूप वाढ होणे.

अँकिलुजिंग (एएस) या विकारामध्ये यामुळे प्रामुख्याने पाठीच्या कण्यात गुंतागुंत होते. यावर वैद्यकीय उपचार झाले नाही, तर या दाहामुळे हालचालींवर निर्बंध येतात, अखेरीस रुग्णाला व्हीलचेअरवरची मदत लागू शकते किंवा अंथरुणालाही तो खिळून राहतो.

लॉकडाउनच्या काळात स्पाँडिलायटिसचे व्यवस्थापन करण्याचे काही प्रभावी मार्ग पुढे दिले आहेत-

-स्पाँडिलायसिसचा त्रास असलेल्यांनी उत्तम वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यकारक जीवनशैली आणि शक्य असल्यास घरून काम करणे हे प्रतिबंधात्मक उपाय केलेच पाहिजेत.

– करोनामुळे चिंताग्रस्त होऊन औषधे बंद करू नयेत. रुग्णांनी त्यांची नियमित औषधे सुरू ठेवावीत व व्यायामही करत राहावे. मात्र, लक्षणांमध्ये होणारा बदल किंवा चढउतार यांच्यासंदर्भात अस्थिव्यंगतज्ज्ञांना माहिती देत राहायला हवी. गरज पडल्यास सेकंड ओपिनिअनही घ्यायला हवे.

-ज्या रुग्णांना पूर्वीपासून उपचार दिले जात आहेत, त्यांनी ती औषधे सुरू ठेवावी. बायोलॉजिक्स पद्धतीमधील औषधे अचानक बंद केल्याने अवस्थेची तीव्रता वाढू शकते. म्हणूनच अशा वेळी वैद्यकीय तज्ज्ञांचे मत घ्यावे.

-लॉकडाउन किंवा अन्य कोणत्या कारणामुळे तुम्ही डॉक्टरला कन्सल्ट करू शकत नसाल, तर तुमच्या डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयाकडे टेलीमेडिसिन कन्सल्टेशनच्या पर्यायाबाबत विचारणा करा. बहुतेक डॉक्टरांनी टेलीमेडिसिन कन्सल्टेशन सुरू केले आहे. टेलीमेडिसिनबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. याद्वारे तुमचे डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतील.

-व्यायामाचा अभाव आणि वाढलेला ताण कोणत्याही विकाराची लक्षणे अधिक तीव्र करू शकतात. म्हणूनच दररोज व्यायामामध्ये खंड पडू देऊ नका, समतोल आहार घ्या आणि ताणमुक्त जगण्याचा प्रयत्न करा. ध्यानधारणा व योगासनांच्या मदतीने या कठीण काळात ताण कमी करता येतो.

-रुग्ण सबक्युटॅन्युअस म्हणजे त्वचेखालील इंजेक्शने घेत असतील, तर ती रुग्णालयाच्या मदतीखेरीज सुरू ठेवता येतील. परिचारिका ही इंजेक्शन्स देऊ शकतात तसेच काहीवेळा स्वत: रुग्णही हे डोस स्वत:ला इंजेक्ट करून घेऊ शकतात. मात्र, रुग्ण जर इंट्राव्हेन्युअस इन्फ्युजन घेत असतील, तर त्यांनी ऱ्हुमॅटोलॉजिस्टकडूनच ते उपचार करून घेणे योग्य ठरेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here