Maharashtra Political crisis | गजानन किर्तीकर यांच्यासारखे नेते सगळं मिळूनही पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी शंका उपस्थित होते. यावेळी राऊत यांना गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटावर (Thackeray camp) केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, आता गजानन किर्तीकर यांच्या बोलण्याला फारसा अर्थ उरलेला नाही.

हायलाइट्स:
- पक्षाने इतकं सगळं देऊनही गजानन किर्तीकर पक्ष सोडून गेले
- आता निष्ठा शब्दाची व्याख्याच बदलावी लागेल
यावेळी संजय राऊत यांनी गजानन किर्तीकर यांच्या पक्षनिष्ठेविषयी शंका उपस्थित केली. गजानन किर्तीकर यांच्यासारखे नेते सगळं मिळूनही पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात निष्ठा या शब्दाविषयी शंका उपस्थित होते. यावेळी राऊत यांना गजानन किर्तीकर यांनी ठाकरे गटावर केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, आता गजानन किर्तीकर यांच्या बोलण्याला फारसा अर्थ उरलेला नाही. त्यामुळे आता यावर गजानन किर्तीकर काही प्रत्युत्तर देणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी
काल मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात खासदार गजानन कीर्तिकर यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यामुळं कीर्तिकर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं पत्रक खासदार विनायक राऊत यांच्याकडून जारी करण्यात आले.शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंना २००४ मध्ये माझा पत्ता कट करायचा होता
मी गेल्या ५६ वर्षांपासून शिवसेनेसोबत आहे, मी पक्षाचा निष्ठावंत होतो. तरीही २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी केला. २००४ मध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मालाड विधानसभा मतदारसंघात माझ्याऐवजी एक उत्तर भारतीय बिल्डर व्ही.के. सिंग याचा भाऊ रमेश सिंग याला उमेदवारी देण्याच्या विचारात होते. त्यांच्यात सुरु असलेल्या गुफ्तगूची माहिती मला मिळत होती. पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी तसं होऊन दिलं नाही. मला चारवेळा आमदारकीचे तिकीट मिळाले. चौथ्यांदा उद्धव ठाकरे माझं तिकीट कापत असताना बाळासाहेब ठाकरे यांनी मला उमदेवारी द्यायला लावली. पण २००९ मध्ये मला निवडणुकीचं तिकीट देण्यात आले नाही. माझा पीए सुनील प्रभूला उद्धव ठाकरे सारखे मातोश्रीवर बोलवून घेत होते. मी तुलाच तिकीट देणार, किर्तीकरांना (Gajanan Kirtikar) देणार नाही, असे उद्धव ठाकरे सांगायचे. एवढा मोठा पक्षप्रमुख पण अशा पद्धतीने विचार करायचा, अशी टीका गजानन किर्तीकर यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.