नवी दिल्ली: पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक घटनेनंतर भारताने चीनला आता आणखी एक झटका दिला आहे. आता रेल्वने पूर्व मालवाहू कॉरिडॉरच्या सिग्नल आणि दूरसंचारविषयक कामासाठी एका चिनी कंपनीला देण्यात आलेला ठेका रद्द करून टाकला आहे. हा ठेका रद्द करताना कामाची गती अतिशय मंद असल्याने हा ठेका रद्द करण्यात येत असल्याचे कारण भारतान दिले आहे. हे काम कानपूर आणि मुगलसरायदरम्यान कॉरिडॉरच्या ४१७ इतक्या मोठ्या भागात केले जाणार होते. डेडीकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल)चे व्यवस्थापकीय संचालक अनुराग सचान यांनी ही माहिती दिली. हा ठेका रद्द करण्याचे पत्र आज जारी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

डीएफसीसीआयएल ही या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी एजन्सी आहे. बीजिंग नॅशनल रिसर्च अण्ड डिझाइन इन्स्टीट्यूट ऑफ सिग्नल अण्ड कम्युनिकेशन ग्रुपला १४ दिवसांची नोटीस दिल्यानंतर हा ठेका रद्द कऱण्याची नोटीस दिली आहे. या ग्रुपला सन २०१६ मध्ये ४७१ कोटी रुपयांचा हा ठेका देण्यात आला होता. चीनी कंपनीला या योजनेतून बाहेर काढण्याचे काम जानेवारी २०१९ मध्येच सुरू करण्यात आले होते. ही कंपनी हे काम योजून दिलेल्या कालमर्यादेत करण्यास सक्षम नव्हती हे या मागील कारण सांगितले जात आहे.

वाचा:

तेव्हा पासून आतापर्यंत ही कंपनी या योजनेचे केवळ २० टक्के इतकेच काम करू शकलेली आहे. डीएफसीसीआयएलने या कंपनीला दिलेला ठेका रद्द करण्याची माहिती जागतिक बँकेला ही माहिती एप्रिल महिन्यामध्येच दिली होती. जागतिक बँक या योजनेसाठी वित्तपुरवठा करत आहे. या कामाची गती अतिशय धीमी होती. या कारणामुळे आमचा ही योजना कार्यान्वित होण्यात मोठा उशीर लागत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही कंपनीला दिलेला हा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेतला असे सचान यांनी सांगितले. आम्हाला अजून जागतिक बँकेकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळालेले नाही. आम्ही हा ठेका रद्द करत असून या कामासाठी लागणार पैसा आम्ही स्वत: देणार असल्याचेही आम्ही जागतिक बँकेला सांगितले असल्याचे सचान म्हणाले.

बातमी वाचा:
वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here