उत्तराखंडमधील बागेश्वर येथील कपकोटमध्ये तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. विषारी मुंग्या चावल्यानं मुलाचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या मोठ्या भावालादेखील मुंग्या चावल्या. त्याची प्रकृती आता ठीक आहे. पौसारी गावात गुरुवारी ही घटना घडली.

 

ant attack
देहरादून: उत्तराखंडमधील बागेश्वर येथील कपकोटमध्ये तीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. विषारी मुंग्या चावल्यानं मुलाचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या मोठ्या भावालादेखील मुंग्या चावल्या. त्याची प्रकृती आता ठीक आहे. पौसारी गावात गुरुवारी ही घटना घडली.

पौसारी गावात राहणाऱ्या भूपेश राम यांचे दोन मुलगे गुरुवारी दुपारी घरासमोरील अंगणात खेळत होते. पाच वर्षांचा प्रियांशु आणि तीन वर्षांचा सागर खेळण्यात दंग असताना दोघांना मुंग्या चावल्या. त्यांनी घरात धाव घेतली. त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. तीन वर्षांचा सागरचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. प्रियांशुवर उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर कुटुंबीय त्याला घरी घेऊन आले.
अरेरे! पतीच्या निधनाचा धसका, रडता रडता पत्नी बेशुद्ध पडली; ४ तासांनंतर प्राणज्योत मालवली
गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास प्रियांशु आणि सागरला घेऊन त्यांचे नातेवाईक रुग्णालयात आले होते अशी माहिती जिल्हा रुग्णालयातील डॉ. राहुल मिश्रा यांनी दिली. सागरचा आधीच मृत्यू झाला होता. प्रियांशुवर उपचार करण्यात आले होते. लाल रंगांच्या मोठ्या मुंग्यांनी मुलांना चावा घेतल्याचं त्यांचे वडील भूपेश राम यांनी सांगितल्याचं मिश्रा म्हणाले. मुलांना दुपारच्या सुमारास मुंग्या चावल्या. कुटुंबीय त्यांना रात्री रुग्णालयात घेऊन आले. कुटुंबियांनी मुलांना रुग्णालयात आणण्यास उशीर केल्याचं मिश्रा यांनी सांगितलं.
एकटेच बिर्याणी खाताय? बायको संतापली, नवऱ्यानं पेटवून दिलं; तिनं मिठी मारली अन् सारंच संपलं
तीन वर्षांच्या सागरच्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गावावर शोककळा पसरली आहे. लाल रंगाच्या मुंग्या अतिशय विषारी मानल्या जातात. त्यांना रेड फायर मुंग्या किंवा बुलेट मुंग्यादेखील म्हटलं जातं. या मुंग्या चावल्यास तातडीनं उपचार करायला हवेत. अन्यथा जीव जाऊ शकतो. मुंग्या चावल्यानं जीव गेल्याची बागेश्वर जिल्ह्याची ही पहिलीच घटना आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here