Maharashtra Political crisis | बावनकुळे यांनी साताऱ्यात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मोठ्या प्रमाणात बावनकुळे यांच्यावर टीका झाली याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले,उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. मी कोणालाही वाईट भाषेत बोललो नाही.

हायलाइट्स:
- बाळासाहेबांचे विचार सोडावे लागले तरी उद्धवजींना फरक पडत नाही
- त्यांना फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी पाहिजे
बावनकुळे यांनी साताऱ्यात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूटोणा केल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मोठ्या प्रमाणात बावनकुळे यांच्यावर टीका झाली याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले,उद्धव ठाकरे यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. मी कोणालाही वाईट भाषेत बोललो नाही. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार मी बोललो. मात्र उद्धव ठाकरे अजूनही पवारांच्या ट्रॅपमध्ये फसले आहेत. उद्या शरद पवारांनी सांगितलं तर उद्धव ठाकरे काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन बसतील. इतके वर्ष उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबत राहून विधानसभा, लोकसभेचा प्रचार केला. मात्र, निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांचे ऐकत विचाराशी कॉम्प्रमाईझ करून जीवनातील मोठी चूक केली असून राज्यातील काही पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. बाळासाहेबांचे विचार सोडावे लागले तरी उद्धवजींना फरक पडत नाही. त्यांना फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी पाहिजे, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नेत्यांच्या पोरांनी काँग्रेस जोडो यात्रा हायजॅक केली: बावनकुळे
बावनकुळे हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून माझ्या या दौऱ्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश देखील होत आहेत. साताऱ्यात १२०० काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. एका बाजूला राहुल गांधी यांची यात्रा महाराष्ट्रात आणि कार्यकर्ते भाजपमध्ये अशी परिस्थिती सध्या काँग्रेसमध्ये आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत काँग्रेस कार्यकर्ते कमी आणि आणि नेत्यांची पुढची पिढीच लॉन्चिंग होत असून राहुल गांधींची यात्रा नेत्यांनी आणि त्यांच्या मुलांनी हायजॅक केली आहे. सामान्य कार्यकर्त्यांना यात्रेचा गंध ही नाही अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. मागील अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार हायजॅक केले होते. २०२४ पर्यंत भाजप आणि शिंदे गटाकडे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असून महाविकास आघाडीमध्ये मोठ मोठे बॉम्बस्फोट होणार असून २०२४ ला विरोधी पक्षांना उमेदवार देखील मिळणार नाही, असा दावा बावनकुळे यांनी केला.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.