दिल्ली: दोन महिन्यांच्या बाळाच्या अपहरणाचा छडा लावण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपी तरुणीला अटक केली आहे. मृत वडिलांना जिवंत करण्यासाठी मुलाचं अपहरण केल्याचं तरुणीनं पोलिसांना सांगितलं. बाळाचा बळी देण्याच्या हेतूनं तरुणीनं हे कृत्य केलं. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई केल्यानं अनर्थ टळला.

१० नोव्हेंबरला संध्याकाळी ४ च्या सुमारास अपहरणाची माहिती मिळाल्याचं दक्षिण दिल्लीच्या डीसीपी ईशा पांडे यांनी सांगितलं. गढी गावातून दोन महिन्यांच्या बाळाचं अज्ञात तरुणीनं अपहरण केलं होतं. यानंतर पोलिसांनी तातडीनं वेगवान हालचाली सुरू केल्या. आरोपी तरुण बाळाच्या आईला सफदरजंग रुग्णालयात भेटली होती. लहान मुलांची देखभाल करणाऱ्या एनजीओची सदस्य असल्याची बतावणी तिनं केली.
एकटेच बिर्याणी खाताय? बायको संतापली, नवऱ्यानं पेटवून दिलं; तिनं मिठी मारली अन् सारंच संपलं
आई आणि बाळाला मोफत औषधं देण्याचं आश्वासन तरुणीनं दिलं. नवजात बाळाच्या तपासणीदरम्यान ती कुटुंबाच्या संपर्काच राहिली. ९ नोव्हेंबरला आरोपी तरुणी बाळाची तपासणी करण्यासाठी गढी गावात गेली. दुसऱ्या दिवशी ती पुन्हा त्यांच्या घरी गेली. बाळाला फिरवून आणते असं आरोपीनं बाळाच्या आईला सांगितलं. तिनं २१ वर्षीय भाचीला सोबत पाठवलं.
किडनी स्टोन काढण्यासाठी सर्जरी; ६ महिन्यांनंतर असह्य वेदना; रिपोर्ट पाहून होमगार्ड हादरला
अपहरणकर्ती तरुणी बाळाला आणि २१ वर्षीय रितूला घेऊन स्विफ्ट कारनं निघाली. तिनं रस्त्यात रितूला शीतपेय दिलं. त्यानंतर रितू बेशुद्ध पडली. आरोपीनं तिला उत्तर प्रदेशात गाझियाबादमध्ये रस्त्यावर फेकून दिलं. काही वेळानं रितू शुद्धीवर आली. तिनं कुटुंबाशी संपर्क साधला आणि बाळाचं अपहरण झाल्याची माहिती दिली.

अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. कारच्या रजिस्ट्रेशन नंबरवरून पोलिसांनी आरोपीच्या घरचा पत्ता शोधला. तिच्या घरी पोलीस पोहोचले. मात्र तिथे आरोपी सापडली नाही. आरोपी तरुणी शुक्रवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास दिल्लीच्या कोटला मुबारकपूर येथील आर्य समाज मंदिरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे आरोपीला अटक केली आणि बाळाची सुखरुप सुटका केली. आरोपीचं नाव श्वेता असून ती २५ वर्षांची आहे.
अंगणात खेळत होता चिमुकला, हाताला मुंग्या चावल्यानं घरात पळाला; काही तासांत अनर्थ घडला
ऑक्टोबर २०२२ मध्ये श्वेताच्या वडिलांचा मृत्यू झाला. पुरुष जातीच्या नवजात बालकाचा बळी दिल्यास वडिल जिवंत होऊ शकतात असं अंत्यसंस्कारावेळी श्वेताला कोणीतरी सांगितलं. तेव्हापासून श्वेतानं नवजात बालकाचा शोध सुरू केला. ती सफदरजंग रुग्णालयात गेली. नवजात बालकं आणि त्यांच्या आईंना मदत करणाऱ्या एनजीओची सदस्य असल्याची बतावणी करत तिनं तिथल्या लोकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिनं बाळाच्या अहरणाचा कट रचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here