Maharashtra Politics | ठाणे न्यायालयाने विवियाना मॉल प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आव्हाड यांच्या वकिलांकडून तात्काळ जामिनासाठी अर्ज करण्यात आला. तेव्हा न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना सशर्त जामीन मंजूर केला. कालच्या अटकेनंतर आव्हाडांना आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती

हायलाइट्स:
- ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा आव्हाडांनी प्रयत्न केला होता
- काल सायंकाळी ४ वाजता आव्हाडांना अटक झाली होती
तत्पूर्वी ठाणे न्यायालयाने विवियाना मॉल प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आव्हाड यांच्या वकिलांकडून तात्काळ जामिनासाठी अर्ज करण्यात आला. तेव्हा न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आव्हाडांसह इतरही १२ जणांना सशर्त जामीन मंजूर केला. कालच्या अटकेनंतर आव्हाडांना आज कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दुपारी जामिनासंदर्भात झालेल्या सुनावणीत आव्हाडांसह इतर १२ जणांना जामीन मिळाला आहे. ठाण्याच्या व्हिव्हियाना मॉलमधील चित्रपटगृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा आव्हाडांनी प्रयत्न केला होता. यादरम्यान जरासा राडाही झाला होता. याच प्रकरणावरुन आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला होता. काल सायंकाळी ४ वाजता आव्हाडांना अटक झाली होती.
चाणक्याचा पोलिसांना फोन? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
पोलिसांनी आव्हाड यांना शनिवारी ठाणे न्यायालयात सुनावणीसाठी हजर केले. यावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahd) यांनी नातेवाईकांशी बोलताना एक खळबळजनक दावा केला होता. पोलिसांना सतत एका चाणक्याचे फोन येत आहेत. पोलिसांवर कारवाईसाठी दबाव आणला जात आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केल्याचे समजते. या चाणक्याकडून जितेंद्र आव्हाड यांना पोलीस कोठडीत जेवणही मिळू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे हा चाणक्य नक्की कोण, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.