अहमदनगर : खोक्यांवरून घोषणाबाजी केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांच्या जिव्हारी लागत आहे. त्यामुळे अशा घोषणा दिल्यास कारवाईचा इशारा शिंदे गटातील मंत्र्यांकडून दिला जात आहे. मात्र, ठाकरे गटातील कार्यकर्ते संधी मिळताच या घोषणा दिल्याशिवाय राहत नाहीत. राहुरी तालुक्यात असा प्रकार पहायला मिळाला. शिंदे गटातील खासदार सदाशिव लोखंडे तालुक्यातील टाकळीमिया ग्रामपंचायतीत आले होते. तेव्हा दोन गट समोरासमोर भिडले. यावेळी खोक्यावरून घोषणा देणाऱ्या ठाकरे गटातील सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (Activists of Thackeray group detained by police)

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे राहुरी तालुक्यातील टाकळीमिया ग्रामपंचायतीत एका बैठकीसाठी आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गट आमने सामने आले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.

मिसिंग लिंक प्रकल्प : लोणावळा तलावाच्या तळाखाली जगातील सर्वात रुंद बोगदा, मुख्यमंत्री म्हणाले…

‘मुख्यमंत्री शिंदे आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा शिंदे गटाने दिल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या समर्थकांनी ‘पन्नास ओके एकदम ओके. या गद्दारांचा करायचं काय खाली डोकं वर पाय,’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. तेथे उपस्थित असलेल्या राहुरी पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ‘५० खोके एकदम ओके’, अशा घोषणा देणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतले. घोषणाबाजीसोबतच काही जण काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवत होते. ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्याविरूद्ध पुढील कारवाई सुरू आहे. खासदार लोखंडे यांनी मात्र बैठक आवरती घेत तेथून निघून जाणे पसंत केले.

राहुल गांधी नांदेडमध्ये आले… संगमनेर तालुक्यातील ४० शिवसैनिकांनी घेतला मोठा निर्णय
खासदार लोखंडे राहुरी तालुक्यातील ३२ गावाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शिंदे गटाची कार्यकारणी जाहीर केली आहे. या नव्या कार्यकारणीतील सदस्य अण्णासाहेब म्हसे, बापूसाहेब शिर्के, सुनील कराळे, राजेंद्र देवकर, संपत जाधव, श्याम गोसावी, बाळासाहेब पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनाच्या घोषणा दिल्या. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून खोक्यांच्या घोषणा आणि निषेधाचे झेंडे दाखविणारे राहुल सीताराम चोथे, सुभाष मघाजी चोथे, सचिन भाऊसाहेब करपे, हमीद राज महंमद पटेल, विठ्ठल सोन्याबापू सूर्यवंशी, चंद्रकांत शरद सगळगिळे व सुनील रावसाहेब कवाणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राहुरी हा राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मतदारसंघ आहे. तेथे शिंदे गट मजबूत करण्यासाठी खासदार लोखंडे यांचा दौरा सुरू आहे.

बॅनरवरील आजोबांचा फोटो एडिट करून ठेवले व्हाट्सअप स्टेटस, भडकलेल्या अकरा नातवंडांनी उचलले धक्कादायक पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here