वॉशिंग्टन: करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच जाहीर केले होते. जगभरात अमेरिकेत सर्वाधिक करोना चाचणी झाली असून त्यानंतर भारतात करोना चाचणी करण्यात आली आहे. अमेरिकेखालोखाल भारताने करोनाविषयक आरोग्य चाचण्या केल्या असल्याची माहिती व्हाइट हाऊसतर्फे शुक्रवारी देण्यात आली. अमेरिकेने आत्तापर्यंत चार कोटी २० लाख नागरिकांच्या करोना चाचण्या केल्या असून त्या खालोखाल भारताने एक कोटी २० लाख चाचण्या केल्या आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसच्या जनसंपर्क सचिव केली मॅकनेनी यांनी दिली.

अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत आम्ही कितीतरी अधिक प्रमाणात करोना चाचण्या केल्या आहेत यात शंका नाही. हा आकडा आता चार कोटी २० लाखांवर पोहोचला आहे व आमच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी तत्कालीन ओबामा सरकारला लक्ष्य केले. ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधीचा पायंडा मोडत विक्रमी चाचण्या केल्या आहेत. बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत २००९मध्ये ‘एच१एन१’ फ्लूची साथ आली असता केंद्रीय आरोग्य यंत्रणेने राज्यांना आरोग्य चाचण्या थांबवण्याची तसेच, रुग्णांची मोजणी न करण्याची सूचना केली होती, असे त्यांनी सांगितले.

वाचा:

अमेरिकेत करोनाबाधितांचा आकडा ३५ लाखांवर पोहोचला असून एक लाख ३८ हजार नागरिकांचा यात मृत्यू झाला आहे. अमेरिकेत करोनाच्या वाढत्या संसर्गाला ट्रम्प प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप डेमोक्रेटीक पक्षाने केला असून सुरुवातीच्या टप्प्यात करोनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे संसर्ग फैलावला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

वाचा:

वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या ३७ लाख ७० हजार झाली असून एक लाख ४२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १७ लाख ४१ हजार जणांनी आजारावर मात केली आहे. अमेरिकेत एक दशलक्ष लोकसंख्येमागे ११ हजार ३८७ जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर ४२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक दशलक्ष लोकसंख्येमागे एक लाख ४० हजार जणांची चाचणी करण्यात आली आहे. भारतात दहा लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, २६ हजारजणांचा मृ्त्यू झाला आहे. भारतात एक दशलक्ष लोकसंख्येमागे ७५४ जणांना करोनाची बाधा झाली असून १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक दशलक्ष लोकसंख्येमागे ९७३० जणांची चाचणी करण्यात आली आहे.

वाचा:

वर्ल्डोमीटर संकेतस्थळाच्या माहितीनुसार, रशियामध्ये दोन कोटी ३६ लाख नागरिकांची करोना चाचणी झाली असून ही संख्या अमेरिकेनंतरची सर्वाधिक संख्या आहे. तर, चीनमध्ये सर्वाधिक ९ कोटी ४ लाखजणांची करोना चाचणी झाली आहे. ही संख्या अमेरिकेहून अधिक आहे. मात्र, व्हाइट हाऊसने दिलेल्या माहितीमध्ये चीन व रशियाचा उल्लेख टाळला आहे. त्यामुळे चीन व रशियाच्या आकडेवारी अमेरिक मानत नसल्याची चर्चा आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here