डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी निवासी विभागातील रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थामुळे मनसेने सत्ताधारी शिवसेनेला अनेकवेळा कोंडीत पकलडे होते. यावरून मनसे आणि शिवसेनेत अनेकदा आरोप प्रत्योरोप करण्यात आले होते. तसेच मनसेने रस्त्याच्या कामावरून अनेकदा बॅनर लावत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. याला शिवसेने सुद्धा बॅनर मधून उत्तर दिले. मात्र तुम्ही रस्त्यांचे काम सुरू केले तर तुमच्या अभिनंदनाचे बॅनर देखील लावू असे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले होते. आता मनसे आमदार पाटील यांनी दिलेला शब्द पाळत डोंबिवली एमायडीसी निवासी विभागात बॅनर लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. (raju patil put up a banner congratulating the cm eknath shinde)

डोंबिवली एमआयडीसी रस्त्यांच्या विकासासाठी निधी मंजूर होतात, बॅनर देखील लागतात, मात्र कामाची सुरुवात होत नाही. यावरुन मनसेने, ‘कधीतरी तयार झालेले रस्ते दाखवा’, अशा आशयाचे बॅनर एमआयडीसी भागात लावत शिवसेनेला डिवचले होते. डोंबिवली एमआयडीसीतील रस्त्यांची काम गेले अनेक वर्षे न झाल्याने या रस्त्यांची खड्डे पडून चाळण झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी ११० कोटींचा निधी मंजूर झाला असून २० वर्षांपासून रखडलेले रस्ते लवकरच नीट होणार असल्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आणि त्याचे बॅनरदेखील या भागात लागले होते.

शिंदे गटातील खासदारासमोर ‘पन्नास खोके’च्या घोषणा, ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
बॅनर लागून सहा-सात महिने उलटले तरी कामास सुरुवात न झाल्याने यावरुन मनसेने शिवसेनेला ट्रोल करीत एमआयडीसी परिसरात बॅनर लावले होते. ‘कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा’, असे या बॅनरवरील ठळक विधान शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. तसेच मनसे आमदार राजू पाटील यांनी श्रेयाचे लागलेले बॅनर तिनदा फाटले पण काम झाले नाही, असा खोचक टोला ट्विटरच्या माध्यमातून लगावला होता.

दरम्यान, खासदार शिंदे हे मनसे आमदार पाटील यांना उद्देशून म्हणाले, रस्त्यांच्या कामासाठी निधी आणला, टेंडर देखील निघाले असून आता त्या कामांचा शुभारंभ देखील झाला आहे. शिवसेना वचन देते आणि आज ही वचनपूर्ती झाली आहे. काही लोक म्हणाले होते की काम करुन दाखविल्यास अभिनंदनाचे बॅनर लावू, तर उद्या हे बॅनर लागतील यात तिळमात्र शंका नाही, असा टोला त्यांनी पाटील यांना लगावला. यावर पाटील यांनी बॅनर लावणार असे सांगितले.

जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर, ठाकरेंचा शिंदेंना धक्का… वाचा, मटा ऑनलाइनचे टॉप १० न्यूज बुलेटीन
तसेच पालकमंत्री शिंदे यांनी देखील पाटील यांना तुम्हाला बॅनर लावावे लागतील असा खोचक सल्ला दिला होता. यावर मनसे आमदार पाटील म्हणाले, चांगले काम केले तर अभिनंदन आणि कौतुक करण्यास काहीच हरकत नाही. आम्ही सक्षम विरोधक आहोत. सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकून काम करुन घेणे हे आमचे काम आहे, हा लोकांचा विजय आहे आणि काम सुरु झाले तर मी अभिनंदनाचा बॅनर नक्की लावणार असे सांगितले.

आता याच रस्त्याची कामे सुरू झाली असून मनसे आमदार यांनी दिलेला शब्द पाळत डोंबिवली एमायडीसी निवासी विभागात बॅनर लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यामुळं दोन्ही राजे टेंशनमध्ये?; काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here